आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेमध्ये कोरोना बळींची संख्या 39, आज 41 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1117 वर पोहचली

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादच्या ग्रामीण भागात अर्थचक्र ‌उद्यापासून पुन्हा सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

औरंगाबादमध्ये तीन जणांचा मृत्यू  

शहरात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 39 वर पोहोचली आहे. इंदिरा नगर बायजीपुरा येथील 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना 14 तारखेला घाटीत भरती करण्यात आले होते आणि 14 तारखेलाच अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना पंधरा वर्षांपासून उच्च रक्तदाब होता. आज सकाळी 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जयभीमनगरमधल्या 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी यांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच रहेमानिया कॉलनीतील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडेपाच वाजता या महिलेचा घाटीत मृत्यू झाला आहे.

ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 22 वर

शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोना पाय पसरू लागला आहे. जिल्ह्यातील 9 पैकी 5 तालुक्यांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. बुधवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 22 पर्यंत गेली. यात गंगापूर तालुक्याील फुलशिवरा गावात सर्वाधित 10 रुग्ण आहेत. तर औरंगाबाद तालुक्यातील दौलताबाद 2, बजाजनगर 3, वडगाव कोल्हाटी 1, खुलताबाद तालुक्यात 1, कन्नडमधील देवळाणा 2, धनगरवाडी-औराळा 1, आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे 2 कोरोनाबाधित आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

: गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1),  संजय नगर (1),  सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे.

औरंगाबाद : उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ६ तास खुली

औरंगाबाद शहरात २१ मेपासून राेज सकाळी ७ ते १ या वेळेमध्ये किराणा, दूध, भाजीपाला, मेडिकलसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. दुपारी १ नंतर लाॅकडाऊन कडक असेल.

औरंगाबादच्या ग्रामीण भागात अर्थचक्र ‌उद्यापासून पुन्हा सुरू

> मनपा हद्द वगळता एसटी बस धावतील. दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी.

> गर्दीच्या शक्यतेमुळे मद्य विक्रीला परवानगी नाहीच.

> रेस्टॉरंट, बार, सिनेमा हॉल ही गर्दीची ठिकाणे बंद राहणार.

> बसमध्येही निम्मेच प्रवासी.

बातम्या आणखी आहेत...