आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये आज दोघांचा मृत्यू, तर 60 रुग्णांची वाढ; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1179 मृतांची संख्या 41 वर पोहचली

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 473 रुग्ण कोरोनामुक्त, तर बळींची संख्या 41 वर

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे. आसेफिया कॉलनीतील 48 वर्षी तर रहेमानिया कॉलनीतील 65 वर्ष पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमधल्या मृत्यूची संख्या 41 झाली आहे. हे दोन्ही मृत्यू बुधवारी घाटीत झाले आहेत. रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या 41 मृत्यूंपैकी 38 मृत्यू घाटीत झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी आणखी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. रात्रीतून 54 कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

दुपारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला आहेत.

जिल्ह्यात रात्रीतून आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), सिटी चौक (6), मकसूद कॉलनी (1), हडको एन-12 (1), जयभीम नगर (11), हुसेन कॉलनी, गल्ली नं.9 (1), खडकेश्वर (1),  न्याय नगर, गल्ली न.18 (2), हर्सुल कारागृह (1), खिवंसरा पार्क,उल्कानगरी (2), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (2), मुकुंदवाडी (5), आदर्श कॉलनी (1), काबरा नगर (1), उस्मानपुरा (3), हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 (4) आणि पडेगाव येथील मीरा नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 28 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.

शहर व जिल्ह्यात बुधवारी आणखी 43 जणांना काेराेनाची लागण झाली व तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1119 तर बळींची संख्या 39 झाली आहे. रुग्णांत जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डाॅक्टरसह त्याच्या कुटुंबातील आई, वडील, एक वर्षाच्या पुतणीचा समावेश आहे. पाेलिस काॅलनीतही एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून काेराेनामुक्त झालेल्या 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे काेराेनामुक्त रुग्णांची संख्या 473 झाली आहे. दरम्यान, मंंगळवारी रात्री ते बुधवारी 3 काेराेनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 39 वर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...