आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात गुरुवारी 65 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 4 जणांचा मृत्यू; एकूण संख्या 1769

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 92 नवे रुग्ण, जालन्यात 58 वर्षीय वृद्धेचा मृत्यू

गुरुवारी ६५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या १७६९, झाली आहे. शहरात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा ९२ वर पोहोचला. विठ्ठलनगर व समर्थनगरात रुग्ण आढळले आहेत. विठ्ठलनगरमध्ये एका इलेक्ट्रॉनिक व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

मराठवाड्यात ९२ नवे रुग्ण, जालन्यात ५८ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

औरंगाबाद | गुरुवारी ९२ रुग्णांची भर पडली. जालना येथे एका ५८ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ५ रुग्ण आढळले. नांदेड येथे ७, उस्मानाबाद जिल्ह्यात १०, हिंगोली ३, तर परभणीत दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

बुधवारी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील चोंढी खुर्द येथे १७ वर्षीय विद्यार्थी, वसमत तालुक्यातील हयातनगर येथील १२ वर्षाची मुलगी व २३ वर्षाच्या तरुणालाही कोरोनाची बाधा झाली आहे. नांदेडमध्ये ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे एक तर परभणी शहरातील मिलिंदनगर भागात एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात १० नवे रुग्ण आढळले. ७ रुग्ण काकानगरचे आहेत. ते पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...