आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:बुधवारी आढळले 217 नवे रुग्ण तर 9 बळी, जिल्ह्यात आजवर एकूण २,८५७ रुग्ण कोरोनातून मुक्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 312 नवे रुग्ण, 12 बळी

जिल्ह्यात बुधवारी २१७ नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ५,७८२ वर गेला. यासोबतच बळींची संख्याही २७१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आजवर एकूण २,८५७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

मराठवाड्यात 312 नवे रुग्ण, 12 बळी

मराठवाड्यात बुधवारी ३१२ नवे रुग्ण तर १२ मृत्यू नाेंद झाले. जालना जिल्ह्यात ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात २७, बीड ३, नांदेड १६, लातूर ३४, हिंगोली ६, उस्मानाबाद ६ आणि परभणी जिल्ह्यात ३ असे सात जिल्ह्यांत ९५ नवीन रुग्णांची भर पडली.

जालन्याच्या दाना बाजार परिसरातील मृत महिलेला मधुमेह व हृदयरोगाचा त्रास होता. दुसरा मृत रुग्ण हॉटेल अंबर परिसरातील असून त्याचे मूत्रपिंडाचे ऑपरेशन झाले होते. तिसरा मृत बुऱ्हाण परिसरातील असून त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या.

0