आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये कोरोनाचा 20 वा बळी, चार रुग्णांची वाढ; जिल्ह्यातील आकडा 747 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बँका, रुग्णालय आणि खासदारांच्याकार्यालयासमोर गर्दी; नियमाला ठेंगा - Divya Marathi
बँका, रुग्णालय आणि खासदारांच्याकार्यालयासमोर गर्दी; नियमाला ठेंगा
  • पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 742, तर बळींची संख्या 19 वर

औरंगाबादमध्ये गुरुवारी सकाळी  55 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यानंतर दुपारी आणखी चार रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या 747 वर पोहोचली आहे. आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01),  संजय नगर (01)  बजाज नगर (वाळूज) (01) , भीमनगर, भावसिंगपूर मध्ये 15, उस्मानपुरा 7, सातारा ग्रामपंचायत परिसर 6, संजय नगर 3, हुसेन कॉलनी 2, न्याय नगर 2, तर शिवपुरी पडेगाव 1, यासह कांचनवाडी नारळी बाग ऑफिस, दत्त नगर, पुंडलिक नगर, गुरू नगर,  नंदनवन कॉलनी गारखेडा, शहानुरवाडी, कीलेअर्क, बेगमपुरा, सिल्क मिल्क कॉलोनी आणि बन्सीलाल नगर या भागात प्रत्येकी एक नागरीक आढळला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनामूळे 20 वा मृत्यू 

गारखेडा हुसेन कॉलनी येथील 55 वर्षीय महिला 12 मे रोजी खाजगी दवाखान्यातून घाटीमध्ये अतिदक्षता विभागात भरती करण्यात आली होती. त्यांना मधुमेह उच्च रक्तदाब त्रास होता. 12 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.14 मे रोजी सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी या महिलेचा मृत्यू झाला.

जालन्यात ३ रुग्ण वाढले, ऑरेंजमधून रेड झोनमध्ये

जालना जिल्ह्यात बुधवारी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १४ वरून १७ झाली. जिल्हा रेड झाेनमध्ये गेला. बीड, परभणी व उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झाेनमध्येच आहे. दरम्यान, बुधवारी जालना आणि आैरंगाबाद वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत काेराेनाचा नवा रुग्ण आढळला नाही.

बातम्या आणखी आहेत...