आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 70 रुग्णांची वाढ, 10 दिवसांतच 1 हजार रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या 3106

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत आतापर्यंत 1709 जण कोरोनामुक्त, 166 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यासोबत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3106 झाली आहे. यापैकी 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता 1231 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

7 जून राेजी रुग्णसंख्येने 2 हजारांचा पल्ला आेलांडला हाेता. पुढील दहाच दिवसांत त्यात आणखी एक हजाराची भर पडली.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  घाटी हॉस्पीटल परिसर (1), नॅशनल कॉलनी (1), सिंधी कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), पडेगाव (1), लक्ष्मी कॉलनी (2), हर्सुल, जटवाडा (1), म्हसोबा नगर, मयूर पार्क (1), खोकडपुरा (3), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (2), एन आठ सिडको (2), एन नऊ,सिडको (2), महू नगर (1), गजानन नगर, गल्ली नं. नऊ गारखेडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), एन बारा, हडको (1), कैसर कॉलनी (2), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (2),मिसारवाडी (1), नूतन कॉलनी (2), गांधी नगर (1), मुकुंदवाडी (1), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (1), नागेश्वरवाडी (1), श्रीराम नगर (1), रामेश्वर नगर (1), न्यू विशाल नगर (1), आझाद चौक (3), पुंडलिक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1), गणेश कॉलनी (2), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), औरंगपुरा (1), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1), रामदेव नगर (1), बजाज नगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1) या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 31 स्त्री व 39 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.  

Advertisement
0