आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद अपडेट:आणखी एक महिला कोरोनामुक्त, डॉक्टरांचे मानले आभार; महापालिकेकडून शहरात 13 फीव्हर क्लिनिकची स्थापना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुक्त होऊन औरंगाबादकरांना केले सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन

औरंगाबाद शहरातील एन-4 परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, महानगरपालिकेने शहरात 13 विशेष अशा फीव्हर क्लिनिकची स्थापना केली आहे. शहरातील संशयित कोविड-19 रुग्णांमधून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

या विशेष क्लिनिकमध्ये ताप आणि त्या संबंधित संसर्गाचा त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. आणि यामध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये पाठवले जाणार आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर पुढील चाचण्या घेतल्या जातील असे महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जाहीर केले आहे.

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तसेच पालक मंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी तापीचे क्लिनिक स्थापित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनामध्ये अशा स्वरुपाच्या फीव्हर क्लिनिक आणि रुग्णालयांची तीन भागांत विभागणी करणार असल्याची माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये फीव्हर क्लिनिक स्थापित करण्यात आले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, औरंगाबाद जिल्हा कोरोना व्हायरसच्या बाबतीत रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या जिल्ह्यात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या एकूण 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये पोलिस आणि प्रशासनाकडून सक्तीने लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. सोबतच, लोकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...