आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनामुळे गमावले माय-बाप:वडिलांच्या तेरावीच्या दिवशी आई फोन करून म्हणाली -'बेटा मी कोरोनामुक्त झाले, घ्यायला ये!' अवघ्या 10 मिनिटांत रुग्णालयात पोहोचल्यावर कळले आई सुद्धा गेली...

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदीपच्या कुटुंबात आता पत्नी आणि दोन मुले आहेत.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 54 वर्षीय महिलेचा (रा. बायजीपुरा) हृदयविकाराने मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सात जुलैपासून तिच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी तिला सुटी मिळणार होती. तसे तिने मुलाला फोन करून कळवले. मात्र, काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मिनी घाटीतील हा तिसरा मृत्यू ठरला आहे.

दत्तात्रेय ज्याेतिवा वाव्हळ
दत्तात्रेय ज्याेतिवा वाव्हळ

कोरोनाने संदीप (38)च्या डोक्यावरुन आई-वडिलांची सावली हिरावून घेतली आहे. संदीपने सांगितले की, 13 दिवसांपूर्वी वडील दत्तात्रेय ज्योतिबा वाव्हळ (66) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आईदेखील कोरोना संक्रमित असल्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात अॅडमिट होती. वडिलांच्या तेराव्याचा कार्यक्रम करत असताना आईचा फोन आला की, आज मला सुट्टी मिळणार आहे, मला घ्यायला ये. मी 10 मिनिटात आई विजया दत्तात्रय (54) वाव्हळ यांना घ्यायला गेला. मात्र, डॉक्टरांनी तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली.

विजया दत्तात्रय वाव्हळ
विजया दत्तात्रय वाव्हळ

हे ऐकून त्या मुलाला धक्काच बसला. त्याने ही माहिती माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांना दिली. गायकवाड यांनीही दवाखान्यात धाव घेत डॉक्टरांची बातचीत केली. धक्कादायक बाब म्हणजे तेरा दिवसांपूर्वीच या मुलाच्या वडिलांचे कोरोनामुळे घाटीत निधन झाले होते. आधी वडील आणि आता आईचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, त्या महिलेस 17 जुलैला सुटी देण्यात येणार होती. मात्र, अचानक हृदयक्रिया बंद झाल्याने तिचा मृत्यू झाला.

आईच्या स्वागतासाठी फुल आणले, पण...

संदीप म्हणाला की, आईच्या स्वागतासाठी जे फुल आणले होते, ते तिच्याच अंत्यविधीसाठी वापरावे लागले. आईला शुगरची प्रॉब्लम होती, त्याव्यतिरिक्त तिला कोणताच आजार नव्हता. आई स्वतः हॉस्पीटलला चालत गेली होती. फोनवर बोलताना आई एकदम ठीक वाटत होती. आम्ही पोस्टमॉर्टमची मागणी केली, पण कोरोना रुग्णाचा पोस्ट मॉर्टम होत नसल्याचे सांगत नकार देण्यात आला.