आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत आज 28 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1276 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात आढळले 59 नवे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1276 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

   न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), राम नगर, एन-2, सिडको (4), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शंकुतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर,सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 15 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

शहरात शनिवारी ३० नवे रुग्ण सापडले. एकूण रुग्णांची संख्या १२४८ वर पोहोचली. १३ मेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शनिवारी किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय व सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे. शहरातील औरंगपुरा, राजाबाजार व केसापूर भागातही कोरोनाचे रुग्ण आढळले.

मराठवाड्यात आढळले ५९ नवे रुग्ण

मराठवाड्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. शनिवारी अौरंगाबादेत ३०, इतर जिल्ह्यांत २९ नव्या रुग्णांची नोंद झाली. जालन्यात २, बीड ४, हिंगोली ६, नांदेड ९, परभणी २, लातूर ४, तर उस्मानाबादेत २ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

> जालना :

खासगी रुग्णालयातील ३८ वर्षीय कर्मचाऱ्यासह जाफराबादच्या हिवरा काबली गावातील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५४ वर गेली.

> बीड :

शुक्रवारी मध्यरात्री आणखी एक रुग्ण आढळला. तो आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथील आहे. रात्री उशिरा जिल्ह्यात आणखी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

> लातूर :

जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळले. लातूर शहर, पाटोदा (ता. अहमदपूर), जळकोट आणि ‌उदगीर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८१ वर गेली.

> नांदेड :

जिल्ह्यात ९ रुग्ण आढळले. यात ६ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

> हिंगोली :

वसमतमध्ये ५ तर औंढ्यात एक कोरोना रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १०७ पैकी ८९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

बातम्या आणखी आहेत...