आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल ठेवला कायम:घरभाडे ठरले असेल तर ते द्यावेच लागेल, भाडेकरूचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरभाडे ठरले असेल, तर ते द्यावेच लागेल म्हणत भाडेकरूचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले. भाडे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाडेकरूला दणका दिला.

घरमालक लक्ष्मीचंद उल्हासीराम परदेशी यांनी त्यांचे भाडेकरू नंदकिशोर बन्सीलाल साकल, यांच्या विरुद्ध भाडेकरारनाम्याची मुदत संपल्याने जागेतून काढून टाकण्यासाठी व थकीत घर भाडे मिळण्यासाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, औरंगाबाद येथे दिवाणी दावा दाखल केला होता.

दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, औरंगाबाद यांनी घरमालकांचा दावा मंजूर केला. भाडेकरूने दोन महिन्यांच्या आत घर खाली करावे तसेच थकीत घरभाडे व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर निकालाच्या नाराजीने भाडेकरू नंदकिशोर साकल यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.

अपीलामध्ये घरमालक लक्ष्मीचंद परदेशी यांच्या बाजुने अ‌ॅड. संदीप बी. राजेभोसले यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात असा युक्तीवाद केला की, ठरलेले घरभाडे भाडेकरू देत नाही. भाडेकरूने घरभाडे थकवले आहे. नोटीस देऊनही भाडेकरू घर खाली करत नाही. घरमालकास व त्याचे कुटुंबास राहण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, औरंगाबाद यांनी पारीत केलेले आदेश हे बरोबर असून ते कायम करण्यात यावेत.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन व पुराव्यांचा विचार करता जिल्हा न्यायाधीश एस. एम. अगरकर यांनी अपीलार्थीचे अपील हे खर्चासहीत फेटाळून लावले व दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचा निकाल कायम ठेवला.

न्यायालयात घरमालकांच्या बाजूने अ‌ॅड. संदीप राजेभोसले यांनी बाजू मांडली. त्यांना अ‌ॅड. सुधीरकुमार घोंगडे, अ‌ॅड. गायत्री राजेभोसले, अ‌ॅड. दिनेश चव्हाण, प्रशांत गायकवाड, ऋषिकेश निकम यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...