आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:औरंगाबादमध्ये आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 वर

औरंगाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिघांपैकी दोन मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील, मुलगा आणि सुनेला विषाणूची लागण

औरंगाबादमध्ये आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. मृत व्यक्तीचा मुलगा आणि सूनेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या 17 वर्षीय मुलीलाही विषाणूची लागण झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.  अधिकारी म्हणाले की, या नवीन रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसली नाहीत. यातील दोन जण मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील आहेत. 58 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. औरंगाबादच नाही तर मराठवाड्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला होता.   मराठवाडा विभागात एकूण 27 कोरोनाग्रस्त असून लातूर (8), उस्मानाबाद (3), हिंगोली आणि जालना (प्रत्येकी 1) रुग्ण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...