आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ४५ वर्षांवरील व्यक्तींचे सरसकट कोरोना लसीकरण गुरुवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी १०६२ जणांनी याचा लाभ घेतला. विशेष म्हणजे अारोग्य, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. यातील काहींचे दुसरे डोस होते. त्यामुळे अडचण येणार हे लक्षात आल्याने काही सेंटरवर दोन ते तीन रूममध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली. एन-८ आणि एन-११ केंद्रांवरही लसीकरण सुरू झाले. दुपारपर्यंत दोन्ही केंद्रांवर दीडशेचा आकडा पार केला. दुपारनंतर मात्र उन्हाची काहिली वाढल्याने संख्या कमी झाली. दिवसभरात १७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ६४ जणांनी दुसरा डोस घेतला. ७७६ फ्रंटलाइन वर्करने पहिला तर ४८ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षांवरील जास्त ज्यांना विविध आजार आहे, अशा १,६२४ जणांनी पहिला तर आठ जणांनी दुसरा डोस घेतला. ५६१ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर ४० जणांनी दुसरा डोस घेतला. त्यानुसार दिवसभरात ३ हजार २९७ जणांना लसीकरण करण्यात आले.
४५ वर्षांवरील १३.६२ लाख लोकांना लसीचे उद्दिष्ट
एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची माेहीम सरकारने सुरू केली अाहे. त्यानुसार अाैरंगाबाद जिल्ह्यातील १३ लाख ६२ हजार ३५४ लोकांना डाेस देण्याचे उद्दिष्ट अाहे. जिल्ह्यातील लाेकसंख्या ४५ लाख ४१ हजार १७९ अाहे. त्यापैकी ४५ वर्षांवरील ४ लाख ८७ हजार ७०७ लाेक शहरात, तर ८ लाख ७४ हजार ६४७ लोक ग्रामीण भागात असल्याची नाेंद अाहे.
कोणताही त्रास नाही
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे स्वत:हून लस घेण्यासाठी आलो. मला कोणताही त्रास झाला नाही. -शिरीष महामुने, वय ५१, खासगी नाेकरी
पालकानंतर लस घेतली
आधी अाई-वडिलांनी लस घेतली. त्यांना कोणताही त्रास झाला नाही. मलाही अाधीच लस घ्यायची होती. पण वय बसत नव्हते. - राजेंद्र लोखंडे, वय ५९, एन-११
आजार असल्यास अाधी तपासणी
एन-११ येथील आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या अनेकांना मधुमेह, रक्तदाब आणि अन्य गंभीर आजार असल्याचे अाढळले. त्यांच्याकडून माहिती घेऊन अाधी तपासणी करण्यात अाली. एन-८ आणि अन्य केंद्रांवरही अाजारी व्यक्तीची तपासणी करूनच लस दिली जात अाहे.
एका बूथवर पाच कर्मचारी
काही रुग्णालयांत दोन रूममध्ये लसीकरणाची सुविधा अाहे. एका बूथवर एक रूम असल्यास तेथे आयकार्ड तपासण्यासाठी एक पोलिस, ऑनलाइन नोंदणीसाठी शिक्षक, लसीकरणासाठी एक प्रशिक्षित एएनएम आणि प्रमाणपत्रासाठी डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त केले आहेत. जेथे दोन रूम अाहेत, तेथे ही संख्या दुप्पट आहे.
फोटाे सोशल मीडियावर टाका
लस घेणाऱ्यांना त्यांचे फोटो साेशल मीडियावर टाकण्याचा सल्ला देतो. जवळच्या लोकांनाही लस घेण्याची सूचना करण्याचे सांगतो. त्यामुळे लसीकरणास प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचे युद्ध सर्वांना मिळून जिंकायचे आहे. - डॉ. रवी सावरे, वैद्यकीय अधिकारी एन-११
अाम्ही साेबत लस घेतली
आमच्या गल्लीतील काही महिला-पुरुषांनी पहिल्या टप्प्यात लस घेतली. मी आणि माझे पती सोबतच लस घेण्यासाठी आलो. ज्योत्स्ना खडसे, गृहिणी, टीव्ही सेंटर
लोकांना प्रोत्साहन देऊ
अगोदर दीर आणि जाऊबाईंनी लस घेतली. आम्हीही अाज लस घेतल्यानंतर त्रास झाला नाही. त्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन देऊ. - संध्या संजय मुळे, टीव्ही सेंटर
लसीनंतर त्रास झाल्यास एईएफआय सेंटरवर मदत
लस घेतल्यानंतर त्रास झाल्याची एकही घटना समाेर अाली नाही. मात्र, कुणाला त्रास झाल्यास त्यांच्यासाठी जवळच्या एईएफआय (अॅडव्हान्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन) सेंटरवर तपासणी करून अत्यावश्यक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्याची सोय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.