आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना टेस्ट:सहा पटीने वाढल्या औरंगाबाद शहरातील कोरोना टेस्ट; आधी रोज 800 कोरोना टेस्ट व्हायच्या आता दैनंदिन 5000 चाचण्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाउन दरम्यान, दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी शहरात टेस्टिंगसाठी विविध ठिकाणी रांगा लावल्या होत्या.
  • चाचण्या वाढल्याने फायदा झाला, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेंचा दावा

शहरात कोरोनाच्या चाचण्या 6 पटीने वाढवण्यात आल्याचा दावा महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी केला आहे. पत्रकारांनी संवाद साधताना ते शुक्रवारी बोलत होते. जिल्ह्यात 9 दिवसांचा लॉकडाउन नुकताच संपुष्टात आला. या लॉकडाउनचा जास्तीत जास्त कोरोना व्हायरस बाधितांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यासाठी करण्यात आला. जिल्ह्यात लॉकडाउन पूर्वी आणि लॉकडाउन नंतरच्या चाचण्यांची काय परिस्थिती होती याचा तपशील सुद्धा यावेळी पांडे यांनी मांडला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "लॉकडाउन लागू होण्यापूर्वी अर्थात 9 जुलै रोजी आम्ही रोज 700 ते 800 स्वॅब कोरोना टेस्टसाठी पाठवत होतो. त्यातील सरासरी 150 ते 200 कोरोना पॉझिटिव्ह सापडत होते. शहरातील 9 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये आम्ही चाचण्यांची दैनंदिन क्षमता 5000 पर्यंत नेली आहे. रोज होणाऱ्या सरासरी 5 हजार चाचण्यांमध्ये 250 ते 280 कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत." चाचण्या वाढवण्याचा फायदाच होत असल्याचे पांडे म्हणाले आहेत. 

इतर शहरांतून येणाऱ्यांवर करडी नजर

औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्यांवर सुद्धा करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्टेशन आणि शहरातील तपास नाक्यांवर टीम तैनात केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एंट्री करणाऱ्या विविध मार्गांवर 12 पथके तैनात आहेत. तर 2 पथक रेल्वे स्टेशनवर तैनात करण्यात आले आहेत. पुढच्या महिन्यात या पथकांची संख्या 21 वर नेली जाईल असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.