आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद कार्यक्रमात धारदार तलवार:हळदीत तलवार, जंबिया घेऊन नाचणारे 6 जण अटकेत; सोशल मीडियावर फोटो अपलोड करताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राच्या लग्नाच्या हळद कार्यक्रमात धारदार तलवार व जंबिया घेऊन नाचणाऱ्या सहा तरुणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. २६ जानेवारी रोजी रेणुकानगर परिसरात बिभीषण अनिल शिंदे (२१) याच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख (२०, रा. लतीफनगर, सातारा) याने तलवार व शुभम सुरेश मोरे (२२, रा. रेणुकानगर) याने दोन जंबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला लागले.

त्यांच्यासोबत बिभीषण व यश संजय पाखरे (१९), शेख बादशहा शेख बाबा (२२), किरण गोरख रोकडे (२२) यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये चित्रण केले. नंतर ते सोशल मीडियावर अपलोड करताच पुंडलिकनगर पोलिसांच्या हाती लागले. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ सर्वांना अटक करण्याचे निर्देश दिले. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलिस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे यांनी सर्वांचा शोध घेत अटक करून हत्यारे ताब्यात घेतली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. तपास दादाराव राठोड करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...