आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेच्या औषधांची विक्री:संशयिताला एनडीपीएस, क्रांतीचौक पोलिसांच्या बेड्या; 21 जूनपर्यंत कोठडीत रवानगी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत नशेच्‍या औषधींची विक्री करण्‍यासाठी आलेल्या एकाला एनडीपीएस सेल आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून अटक केली. ही कारवाई बाबा पेट्रोल पंप चौकात करण्‍यात आली. आरोपीकडून सुमारे 19 हजार 172 रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यता आला.

शेख सोहेल शेख हारुन (बागवान) (19, रा. व्‍हीआयपी हॉल समोर, गल्ली क्रं.10 इंदीरानगर, न्‍यू बायजीपुरा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी दिले.

सेलला मिळाली माहिती

प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍याचे नाईक भावसिंग चव्‍हाण (43) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, 18 जून रोजी रात्री शेख सोहेल हा बाबा पेट्रोल पंपाजवळ नशेच्‍या औषधींची अवैधरित्‍या विक्री करण्‍यासाठी येणार असल्याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. माहिती आधारे बाब पेट्रोल पंप उड्डाण पुलाशेजारील मध्‍यवर्ती बसस्‍थानकाकडे जाणाऱ्या रोडवर एनडीपीएस सेल आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्त सापळारचून नशेच्‍या औषधींची अवैध विक्री करण्‍यासाठी आलेल्या शेख सोहेलच्‍या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून तीन हजार रुपये किमतीच्‍या 25 नशेच्‍या औषधीच्‍या बाटल्या, 1172 रुपये किंमतीच्‍या 197 गोळ्या, 15 हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा सुमारे 19 हजार 172 रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला पोलिस कोठडी

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी आरोपीकडून जप्‍त करण्‍यात आलेला मुद्देमाल त्‍याने कोठून, कोणाकडून आणला व कोणाला विक्री करणार होता. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...