आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोटच्या १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या मद्यपी पित्यास जन्मठेप व ४० हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी ठोठावली. विशेष म्हणजे पीडितेची आई व शिक्षा ठोठावलेल्या दोषी पतीची पत्नीच तक्रार देण्यासाठी पुढे आली होती. शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात पीडितेच्या ३० वर्षीय आईने फिर्याद दिली होती. २७ जानेवारी २०१९ रोजी फिर्यादी व तिची मुले घरात झोपली होती. आरोपी (३८) नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला व जेवण करून रात्री झोपला.
मध्यरात्री मुलगा रडू लागल्याने फिर्यादी त्याला घराबाहेर फिरवत होती. तेवढ्यात पीडितेने घराचा दरवाजा आतून लावून घेतला. थंडीमुळे दार लावले असल्याने फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगा झोपल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने फिर्यादीने दार वाजवले असता, पीडितेने दार उघडले. फिर्यादीला घरात आल्यानंतर शंका आल्याने तिने घरात जाऊन पाहिले असता, आरोपी पती अर्धवट कपड्यांवर दिसला. त्यानंतर फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, पीडितेने सर्व प्रकार सांगितला. तसेच आतापर्यंत तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचेही सांगितले.
घाटीत वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
यात फिर्यादी, डॉक्टर व मुख्याध्यापकांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची ४० हजारांची रक्कम पीडितेला सुपूर्द करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.