आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंगापूर तालुक्यातल्या ओझरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नातवाने एक मुलगी पळवून नेली. त्याची शिक्षा जमावाने कायदा हातात घेत चक्क आजीला दिली. या भयंकर प्रकाराने पंचक्रोशी हादरून गेलीय. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
पोलिसांनी याप्रकरणी विवेक उर्फ चवल्या पिंपळे, भावड्या, नीतूबाई चावला यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नेमकी घटना काय?
ओझरमध्ये एक डिसेंबर रोजी ही घटना घडली. एका मुलीला वृद्धेच्या नातवाने पळवून नेल्याचा आरोपय. त्या मुलीचा शोध घेतला जातोय. त्यासाठी संशयित वृद्धेच्या घरी पोहचले. त्यांनी नातू कुठे आहे, अशी विचारणा केली. मात्र, पीडित वृद्धेला या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती. त्यांनी संशयितांना तसे सांगितले. तेव्हा त्यांनी शिवीगाळ केली. वृद्धेला मारहाण केली. त्यानंतर वृद्धेला नग्न करून बेदम मारहाण केली. त्यामुळे वृद्धेने टाहो फोडला. मारहाण असह्य झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तितक्यात आरडाओरडा ऐकता पारधी वस्तीवरल्या अनेकांनी वृद्धेच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संशयितांना पोबारा केला होता.
मोबाइलमध्ये शुटींग
संशयितांनी वृद्धेला बेदम मारहाण तर केलीच. शिवाय तिला चारचाकी गाडीतून विवस्त्र करून धिंड काढली. या साऱ्या प्रकाराचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग केले. त्याची क्लिप व्हॉटसअॅपवर व्हायरल केल्याचे समजते. या प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
अखेर गुन्हा दाखल
वृद्धेला मारहाण करून तीन दिवस लोटले. मात्र, या घटनेचा कोणालाही सुगावा नव्हता. वृद्धेवर उपचार सुरू होते. शेवटी त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात जात माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरण कलम 354 नुसार गुन्हा दाखल केलाय. प्रकरणातले संशयित आरोपी फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.