आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:हवालदार प्रेयसीसोबत मिळून फौजदाराची पत्नीला मारहाण

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दाेघांना पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनी निलंबित केले

दीड महिन्यापूर्वी लाच स्वीकारण्यास नकार देऊन स्वत:च लाच देणाऱ्याची तक्रार देणारा पोलिस उपनिरीक्षक मागील दोन वर्षांपासून बाहेरील प्रेमप्रकरणामुळे पत्नीचा अतोनात छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी त्याने हवालदार असलेल्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीला बेदम मारहाण केली. अखेर पत्नीच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक शैलेश उद्धव जोगदंड व ग्रामीण वाहतूक विभागातील २९ वर्षीय प्रेयसीविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दाेघांना पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनी निलंबित केले अाहे.

जाेगदंड हा देवराव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. २०११ मध्ये त्याचे लग्न झाले हाेते. ३५ वर्षीय पत्नीसोबत दोन वर्षांपासून त्याचा वाद सुरू आहे. ठाण्यात साेबत असणाऱ्या एका हवालदार महिलेशी त्याचे प्रेमसंबंध असून दाेघे सोबतच राहत हाेते. १३ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता हवालदार महिला जबरदस्तीने पीडितेच्या घरात अाली. तिला जातिवाचक शिवीगाळ करून टीव्ही व आरसा फोडला. नंतर तिला मारहाण करून खाली पाडले. जाेगदंडनेही पत्नीचे हातपाय पकडून बेडरूममध्ये ओढत नेले व दोघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. नंतर “तुला येथेच जाळून टाकू,

चाकूने गळा कापू’ असे धमकावले.
त्यानंतर पत्नी ठाण्यात जाण्यास निघताच जाेगदंडने तिला अडवून पुन्हा मारहाण करून घरात बंद केले. अखेर पीडितेने वेदांतनगर पोलिसांकडे तक्रार केली. अाधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. १६ एप्रिल रोजी मात्र गंभीर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक शारदा लाटे करत आहेत.

लाच नाकारणारा हाच ‘तो’
२ मार्च राेजी पिशोर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक लाच घेताना पकडला गेला. त्याच दरम्यान देवगाव रंगारीचा उपनिरीक्षक जोगदंडने लाच देणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तेव्हा त्याचे कौतुक झाले. मात्र, दीडच महिन्यात त्याचे खरे रूप समोर अाले. पोलिस विभागातील अनेकांनी त्याच्या वागणुकीची तक्रार केली हाेती.

मुलांनाही पत्नीजवळ राहू दिले नाही, पत्नी नर्स
जाेगदंडने पाच वर्षांचा मुलगा व नऊ वर्षांच्या मुलीला पत्नीची परवानगी न घेता आई-वडिलांकडे नेऊन ठेवले. त्याची पत्नी एका रुग्णालयात नर्स आहे. पतीच्या छळाला कंटाळून तिने यापूर्वी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत पाटील यांनी या महिला हवालदाराची तेथून बदली करत दोघांनाही तंबी दिली हाेती.
पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, पोलिस अधीक्षकांनी केले निलंबित

बातम्या आणखी आहेत...