आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन चोर:डॉक्टरच्या बंगल्यात घुसले चंदनचोर, आरडाओरड केल्यानंतरही काहीच फरक पडेना; शेवटी हतबल होऊन बनवला व्हिडिओ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना शहरातील पुष्यनगरी भागातील डॉ. विवेक घरापुरे यांच्या बंगल्यात घडली आहे.

कोरोना महामारीमुळे देशातील सर्वसामान्य लोक काळजीत पडले आहे. एकीकडे राज्य सरकारही कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून संपूर्ण राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावले आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद शहरांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवडाभरात चोरीच्या डझनभर घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरवारी मध्यरात्री 3 ते 4 चोरट्यांनी एका डॉक्टराच्या घरात प्रवेश केला.

दरम्यान, डॉक्टराला आपल्या घरात चोर घुसल्याची शंका येताच त्यांनी आरडाओरड केली. परंतु, त्या आवाजाला चोरांनी न जुमानता चंदनाचे झाड तोडण्याचे काम सुरुच ठेवले व काम होताच झाड घेऊन पसार झाले. डॉक्टरालादेखीन या सर्व घडामोडीदरम्यान काहीही करता आले नाही. त्यांनी असहाय्यपणे आपल्या घरातून या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना औरंगाबाद शहरातील पुष्यनगरी भागातील डॉ. विवेक घरापुरे यांच्या बंगल्यात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. डॉ. घरापुरे यांनी सांगितले की, चोरांचे आवाज येताच मी टॉर्च घेऊन बालकनीत आलो आणि आरडाओरड करत पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्यांनी उलट अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळावरुन पसार झाले होते.

बातम्या आणखी आहेत...