आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 तारखेला भाजपचा मोर्चा:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये येणार, पाणी प्रश्नावरून वातावरण तापणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 23 मे रोजी औरंगाबादमध्ये भाजपकडून पाणी प्रश्नावरून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली काही दिवस भाजपच्या स्थानिक नेत्यांनी औरंगाबदचा पाणी प्रश्न उचलून धरला आहे. शहरातील पैठण गेट परिसरातून निघालेला हा मोर्चा महापालिका आयुक्तालयाच्या कार्यालयावर धडकणार आहे. अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
औरंगाबाद शहरातील विविध भागात सात, आठ तर कुठे नऊ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. शहरातील वाढता उन्हाळा पाहता हा पुरवठा अत्यंत कमी असल्याने तसेच वितरणातही असमानता असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

एवढी वर्ष महापालिकेची सत्ता असूनही शिवसेनेने पाणी वितरणाचा प्रश्न सोडवला नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तुम्हीही सत्तेत होता तेव्हा का सोक्षमोक्ष लावला नाही असा प्रतिटोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

या प्रकरणी भाजपने मोठे आंदोलन छेडले आहे. मागील आठवड्यात शहरातील सिडको एन-7 भागातील जलकुंभावर भाजपच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. तर शुक्रवारी भाजपने जवळपास 30 तास आंदोलन केले आहे. तेव्हा मनपा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबवण्यात आले. आगामी मनपा निवडणुकीसाठी हाच मुद्दा सर्वांत महत्वाचा ठरणार आहे.

भाजपचा 23 मे रोजी औरंगाबादेत मोर्चा
भाजपकडून औरंगाबादच्या पाणी प्रश्नासंदर्भात 23 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करा. अशी मागणी भाजपकडून करण्यात येणार आहे.

या मागणीसाठी आमदार अतुल सावेंच्या नेतृत्वात काहीच दिवसोपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. आता येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहरात मोर्चा निघणार आहे. शहरातील पैठण गेट परिसरातून निघालेला हा मोर्चा महापालिका आयुक्तालयाच्या कार्यालयावर धडकणार आहे. अशी माहिती औरंगाबाद भाजपकडून देण्यात आली आहे.

शिवसेना विरुद्ध भाजप वाद
शहरातील पाणी प्रश्नामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पाण्याची एवढीमोठी समस्या होण्यामागे शिवसेनेची निष्क्रियता आहे. असा आरोप औरंगाबाद भाजपकडून
करण्यात आला आहे. 30 वर्षे शिवसेनेसोबत भाजपनेदेखील सत्ता उपभोगली आहे. त्यावेळी स्वतः काय केले, याचे भान भाजपने ठेवले पाहिजे असा पलटवार शिवसेनेने केला आहे. आता 23 मे ला देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर काय आरोप करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...