आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सर्वात जास्त हुडहुडी:बुधवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची जिल्ह्यात नोंद, गुरुवारी 2.4 अंशांनी घट, राज्यात थंडीचा जोर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर जिल्ह्यातील किमान तापमानात गुरुवारी 2.4 अंश सेल्सिअसने घट झाली.

तापमानात घसरण

औरंगाबाद जिल्ह्यातील किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस एवढे होते. कमाल तापमानातही 0.2 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवली गेली.

राज्यातील स्थिती

  • राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या थंडीने आता जोर धरला आहे. तूर्त चाहुल लागत असतानाच डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढणार आहे.
  • राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी कोरडे हवामान वाढणार असल्याने थंडीचा कडाका वाढेल.
  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तापमानात घसरण होईल.

शेवटच्या 8 दिवसात होती कमी थंडी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात तापमान घसरले होते. अनेक जिल्ह्यात तापमान हे 12 डिग्री सेल्सिअस पर्यन्त आले होते. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान हे सर्वाधिक कमी होते. मात्र, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी ही कमी झाली होती.

डिसेंबर महिन्यात हुडहुडी

उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे. मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे पिकांवर देखील परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...