आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा:राघव धुमकला दुहेरी मुकुट, संस्कृती सातारकरला विजेतेपद

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी व पुरूष दुहेरी प्रकारात अजिंक्यपद पटकावत राघव धुमकने दुहेरी मुकुट मिळवला. त्याचबरोबर, मुलींच्या एकेरीत संस्कृति सातारकरने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक राखला. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कोर्टवर झालेल्या स्पर्धेत 140 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

विजेत्या खेळाडूंना राज्य बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बाेराळकर, जिल्हा संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, जीएसएम शाळेचे संचालक गुरमित सिंग यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल कुळकर्णी व आभार प्रदर्शन हिमांशु गोडबोले यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर रापतवार, जावेद पठाण, नितीन इंगोले, नरेश गुंडले, सत्यबोध टकसाली, सदाशिव पाटील, वैष्णवी गुंडले, विजय भंडारे यांनी परिश्रम घेतले.

प्रशिक्षकांना शटल बॉक्सचे वाटप :

खेळाडूंना नियमित सरावासाठी मोठ्या प्रमाणात शटल लागतात. त्यासाठी खर्चही होतो. खेळाडूंना मदतीसाठी जिल्हा संघटनेतर्फे प्रशिक्षकांना शटलचे बॉक्स वितरीत करण्यात आले. यावेळी संघटनेचे शिरीष बाेराळकर म्हणाले की, जिल्ह्यातील खेळाडूंचा दर्जा चांगला उंचावला आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या शहरातून घडायला हवा. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो.

राघवची सार्थक रोमांचक लढतीत मात :

मुलांच्या 15 वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत राघव धुमकने तीन सेटपर्यत रंगलेल्या रोमांकच सामन्यात सार्थक नलावडेला पराभूत केले. राघवने पहिला सेट २१-१२ ने आपल्या नावे केला. त्यानंतर सामन्यात पुनरागमन करत सार्थकने उत्कृष्ट स्मॅश मारत १६-२१ ने दुसरा सेट जिंकला. अखेरच्या सेटमध्ये पुन्हा सार्थकची कामगिरी घसरली. त्याचा फायदा घेत राघवने २१-११ ने सामना आपल्या खिश्यात घातला.

इतर अंतिम निकाल :

11 वर्ष मुले - चंद्राशू गुंडले वि.वि. आरव इंगोले (21-14, 21-15). 13 वर्ष - उदयन देशमुख वि.वि. आदित येनगे रेड्डी (21-08, 21-11). 17 वर्ष - आदित्य बेंबडे वि.वि. देवांश बडवे (17-21, 22-20, 21-15). 13 वर्ष दुहेरी - आदित्य येनगे रेड्डी व अर्णव आपटे वि.वि. स्वस्तीद येनगे रेड्डी व गौरव पाटील (21-08, 21-11). 11 वर्ष मुली - परिधि बोडखे वि.वि. वृंदा मणियार (21-10, 21-11). 13 वर्ष - सृष्टि मुळे वि.वि. हिने नैनिका रिंगणगांवकर (21-18, 21-11). 15 वर्ष - सारा साळुंके वि.वि. वृषाली तडमदगे (19-21, 21-03, 21-10).

बातम्या आणखी आहेत...