आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा:बुद्धिबळ संघ निवड चाचणी स्पर्धेत एकूण 60 खेळाडुंचा सहभाग

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बुद्धिबळ संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बुद्धिबळ संघ निवड चाचणी स्पर्धेत 11 व 13 वर्षांखालील एकूण 60 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. कम्युनिटी सेंटर सिडको एन-7 येथे सुरु असेल्या स्पर्धेत कौस्तुभ वाघ, देवांश तोतला, काव्या वाघचौरे, रेणुका गोविंदवार यांनी आपापल्या गटात विजयी सलामी दिली.

या स्पर्धेतील दाेन्ही गटातील अव्वल दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड केली जाणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय पटेल, प्रशिक्षक विलास राजपूत, मिथून वाघमारे, रमाकांत रौतल्ले आदींनी परिश्रम घेत आहेत.

सतिश, श्रेयश, ऋग्वेद विजयी :

स्पर्धेत मुलांच्या 11 वर्षाखालील गटात ऋग्वेद पोदारने अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. त्याने विश्वराज कुमारला पराभूत केले. श्रेयश नलावडेने सोहम कोउरवालला आणि सतिश शेजुळने सत्यजीत जावळेला हरवले. कौस्तुभ वाघ, देवांश तोतलाने आपल्या खात्यात एक-एक गुण जमा केला. इशांत साळवेला पुढे चाल मिळाली. दुसरीकडे, मुलींच्या गटात काव्या वाघचौरेने समर्थ्या मोरेला हरवले. भुमिका वाघे व पलक सोनी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दोघींना अर्धा-अर्धा गुण वाटून देण्यात आला. त्याचबरोबर, 13 वर्षाखालील गटामध्ये रेणुका गोविंदवारने रेवती वाकळेला पराभूत केले. कारुण्या वाघलेने वंशिका तिवारीला हरवले. धनश्री गावंडेने संचिता सोनवणेवर एकतर्फी मात केली.

बातम्या आणखी आहेत...