आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत उभी फूट:भुमरे, सत्तार, अंबादास दानवेंची भाजपशी हातमिळवणी ‘मातोश्री’ला अमान्यच : खैरे

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा बँक निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचे काँग्रेसच्या पॅनलला समर्थन

‘औरंगाबाद जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास अाघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लढवावी, असे अापले मत हाेते. मात्र शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगीही न घेता भाजपच्या पॅनलकडून उमेदवारी दाखल केली. मी पक्षाचा मराठवाड्याचा नेता असताना अापणासही त्यांनी विचारात घेतले नाही,’असा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्वपक्षीय नेत्यांवर केला. ‘शिवसेनेतील नवख्यांना अजून ‘मातोश्री’ काय आहे हे माहीतच नाही,’असा इशाराही त्यांनी नामोल्लेख टाळत दिला.

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मार्च रोजी आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते अामदार हरिभाऊ बागडे, माजी अामदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार विकास पॅनल समाेरासमाेर अाले. गेल्या वेळी ही बँक भाजपच्या ताब्यात हाेती. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी या वेळी महाविकास अाघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी असा सुरुवातीपासून मतप्रवाह हाेता. मात्र एेनवेळी शिवसेनेेचे दिग्गज नेते मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अामदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे अामदार सतीश चव्हाण यांना अापल्या पॅनलकडे वळवण्यात भाजपला यश अाले. त्यामुळे काँग्रेसचा गट मात्र नाराज झाला. या पार्श्वभूमीवर अाता या नाराज गटाने शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे समर्थन मिळवले अाहे.

खैरेंनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अंबादास मानकापे, माजी आमदार सुभाष झांबड, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, नंदू घोडेले अादींची उपस्थिती हाेती. काेराेनाबाधित असल्याने डॉ. कल्याण काळे यांनी अाॅनलाइन हजेरी लावली. खैरे म्हणाले, ‘बागडेंना अजून किती काळ पदे उपभाेगायची अाहेत. भाजपच्या धोरणानुसार ७५ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्याने त्यांनी अाता राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी. मात्र नितीन पाटील यांच्या माध्यमातून बागडे अापली कामे काढून घेत अाहेत. मात्र या निवडणुकीत ‘चमत्कार’ हाेणार अाहे. अामदार अंबादास दानवे हे पक्षात माझ्यापेक्षा सीनियर नाहीत. आपणास ‘मातोश्री’आणि शिवसेना चांगली ठाऊक आहे. नवीन आलेल्यांना माहिती नाही. त्यांना कधी अस्मान दिसेल हे समजणारही नाही,’असा टोलाही त्यांनी सत्तार यांचे नाव न घेता लगावला.

खैरेंचा मी आदरच करतो: अंबादास दानवे
खैरेंनी केलेल्या टीकेबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांना विचारले असता ‘चंद्रकांत खैरे आमचे ज्येष्ठ नेते अन‌् मार्गदर्शक अाहेत. त्यांच मी नेहमीच अादर करताे,’ एवढेच उत्तर देऊन अधिक बाेलणे टाळले.

विरोधी पॅनलचे प्रमुख घोटाळ्यात बुडालेले : काळे
डॉ. कल्याण काळे म्हणाले, ‘बँक वाचवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात अामचे पॅनल उभे अाहे. बागडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन असताना त्यांनी जिल्हा बँकेतील ठेवी काढून जनता सहकारी बँकेत ठेवल्या हाेत्या. आघाडी सरकारमुळे जिल्हा बँकेला साडेआठ कोटी नफा मिळाला अाहे. मात्र विराेधी पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार घोटाळ्यात बुडालेले आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. अंबादास मानकापे यांनी बँक नफ्यात असल्याचे केवळ ढाेल बडवले जात असल्याचा अाराेप केला.’तर माजी आ. झांबड यांनी आमच्या पॅनलमध्ये नेते नसून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे सांगितले.

खैरेंना सहकारात काय कळतं, कल्यान काळेची पाटी कोरीच

हरिभाऊ बागडे यांचे माजी खासदार खैरेंना प्रत्युत्तर

‘माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सहकारातील काय कळते? २० वर्षाहून अधिक काळ राजकारणात असतानाही त्यांनी एखादी संस्था नावारूपास का आणली नाही?’असा सवाल करत भाजपचे अामदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले. कॉग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची पाटीही कोरीच अाहे. त्यांची दूध सोसायटी अाहे, नफ्यासाठी त्यांनी अापल्या सोसायटीचे दूध जिल्हा संघाला घालण्याचे काम केले, अशी टीकाही बागडेंनी केली.

खैरेंच्या टीकेला उत्तर देताना बागडे म्हणाले, ‘सामाजिक क्षेत्रात काम करताना वय नव्हे तर काम पाहिले जाते. साधा कार्यकर्ता असताना अापण सहकारी बँक काढली, नंतर आमदार झालो. खैरे इतके वर्षे खासदार हाेते, त्यांनी एखादी पतसंस्था, सोसायटी, बॅंक का काढली नाही. जिल्हा बॅंकेचे पाच रूपयांचे कर्जही आपण घेतलेले नाही. माझ्या पतसंस्थेनेही कधी जिल्हा बॅंकेचे कर्ज घेतले नाही, असे स्पष्टीकरण देताना शिवसेनेचे दाेन मंत्री, जिल्हाप्रमुख अामच्यासाेबत असताना खैरेंना कोणी कासरा लावून ‘तिकडे’ (विराेधी पॅनलकडे) आेढले अशी विचारणाही बागडेंनी केली. काळेंच्या आरोपाचे खंडण करताना बागडे म्हणाले की, दूध संघाचा २०११ मध्ये चेअरमन झाल्यानंतर सहकार कायद्याच्या नियमानुसार मी या दूध संघाचे राखीव निधीचे प्रथम खाते उघडून त्यात नव्वद लाख जमा केले. ठेवींवर कुठली बॅंक अधिक व्याज देते तेथे ठेव ठेवण्यासंबंधी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक निर्णय घेतात. जिल्हा बॅंकेतून ठेव काढून जनता बॅंकेत ठेवली असेल तर निश्चितच दूध संघाचा फायदाच केला. संबंधित रक्कम आता एक कोटी १२ लाख झाली. तेव्हा आपण जिल्हा बॅंकेचे संचालक नव्हतो,’असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

डॉ. काळे यांच्या पिसादेवी गावात जिल्हा बॅंकेची शाखा २०१४ मध्ये मंजूर झाली मात्र जागेच्या वादामुळे अद्याप सुरू झालेली नाही. उलट माझ्या चितेगावमध्ये मी शाखा सुरू केली. डॉ. काळेंनी आपल्या वडिलांची दूध सोसायटी बंद करून नवीन सुरू केली. माझी ४७ वर्षांपासूनची सोसायटी अजूनही सुरू आहे. दूध संघ जे उत्पन्न घेते तेच सोसायटीने घ्यायचे नसते, परंतु काळे आपल्या फायद्यासाठी काहीही करू शकतात,’ असा आरोपही बागडेंनी केला.

बातम्या आणखी आहेत...