आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशी होईल कोरोनावर मात ?:हीच गती राहिली तर शहराच्या लसीकरणास लागतील 3 वर्षे; 18+ लोकांना लस मिळाली तर फरक पडेल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट असतो.  - Divya Marathi
शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट असतो. 
  • मंत्र्यांच्या पैठणमध्ये 40, सिल्लोडला 32 हजार लाभार्थी

तुटवड्यामुळे लस मिळत नाही, असे म्हटले जाते. पण औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांत पुरेसा साठा असूनही लोक फिरकत नाही, असे निदर्शनास येत आहे. अशीच गती राहिली तर औरंगाबादेत पूर्ण लसीकरण होण्यास तीन वर्ष लागतील. ग्रामीण भागातही अशीच स्थिती असून या कासवगतीने लसीकरण झाल्यास तेथे उद्दिष्टपूर्तीस तब्बल सहा वर्षे लागू शकतील.

मंगळवारी म्हणजे २५ मे रोजी औरंगाबाद मनपाने ४५ वर्षांवरील ७८०० जणांना पहिला, दुसरा डोस देण्याची तयारी केली होती. प्रत्यक्षात १२४३ जण आले. २६ मे रोजी ९२५० लस उपलब्ध होत्या. जेमतेम १०३० जणांनी लस घेतली. २७ मे रोजी २० हजार लस होत्या. १३१५ जणांनीच लाभ घेतला. १८ वर्षांवरील लोकांसाठी लस नाही. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर ठेवा, असे सरकारने जाहीर केल्याने प्रतिसाद मिळत नाही, असा एक मतप्रवाह आहे. परंतु, औरंगाबाद शहरातील ४५ वर्षांवरील लोकांची संख्या लक्षात घेता त्यात पुरेसे तथ्य नाही, असे मनपाच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

ग्रामीणमध्ये हीच अवस्था
औरंगाबाद जिल्हा ग्रामीणमध्ये २१ लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना फक्त २ लाख ६७ हजार ५५० जणांनीच लस घेतली आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यात ३२,१३५ तर फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेंच्या पैठण तालुक्यात ४०,५६७ जण लसीकरणासाठी आले. खुलताबादेत सर्वात कमी म्हणजे १२ हजार १७१जणांनी लस घेतली आहे. तेथे १०,११० जणांनी पहिला, २०६१ जणांनी दुसरा डोस घेतला. सोयगावमध्ये ११,४३१ जण पहिल्या, ६,३७३ दुसऱ्या डोससाठी आले.

काेराेनाच्या चाचण्यांतही उदासिनता
काेराेनाच्या चाचण्या कमी असल्याने ग्रामीणमध्ये मृत्युदर वाढल्याचे समोर येत आहे. औरंगाबाद तालुक्यात २४ मेपर्यंत ७५,७५६, फुलंब्री २२,३५४, गंगापूर ५२,२५१ कन्नड ४४,५१२, खुलताबाद १४,७०१, सिल्लोड ३२,४८५, वैजापूर ४७,३०८,पैठण ४९,३०८,सोयगाव ९,४४९ चाचण्या झाल्या.

थंडावली मोहीम
ग्रामीण भागात अनेकांचे बळी गेल्याने लसीसाठी गर्दी उसळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात २१ मे रोजी खेडेगावांत २१२७ तर तालुक्यांच्या, छोटेखानी शहरात ९७९, २२ मेस खेडेगावांत ११०५, तालुका व छाेट्या शहरांत २१०६, २३ मेस खेडेगावांत १७६ आणि तालुका, छाेट्या शहरांत १५७ आणि २४ मेस खेडेगावांत १३४३, तालुका, छोट्या शहरांत १३५० जणांनीच लस घेतली. २४ मेपर्यंत ग्रामीण भागात २,११,२९८ जणांचा पहिला व ४८,१९२ जणांचा दुसरा डोस झाला. जिल्ह्यात २६ मेपर्यंत ४,३६,६७६ जणांचा पहिला, १,२७,७३७ जणांना दुसरा डोस मिळाला.

लोकसंख्या ४५ लाख
लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी सांगितले की, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेतला तर आता जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाख ४१ हजार १७९ आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील ३२ लाख जणांना लस देण्याचे नियोजन आहे. सध्याची गती पाहिली तरी ग्रामीणमध्ये पूर्ण लसीकरणास सहा तर शहरात १६ लाख ७८ हजार लाेकांना लस देण्यास तब्बल तीन वर्ष लागतील.

बातम्या आणखी आहेत...