आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत रोहन शहा, यश वाघ, श्रेयस जाधव, वैदही लोहिया, योगिनी देशमुख, कशिश भराड यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विद्यापीठ परिसरातील पश्चिम विभागीय भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे झालेल्या कॅडेट स्पर्धेत एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
विजेत्या खेळाडूंना उद्योजक मिलिंद पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव डाॅ. दिनेश वंजारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मिलिंद पाटील म्हणाले की,‘औरंगाबादच्या तलवारबाजी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव उंचावले आहे. आता ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याच्या दृष्टीने युवा खेळाडूंनी मेहनत करावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी औरंगाबादच्या खेळाडूंच्या आम्ही निश्चित पाठीशी उभे राहू. त्यांना आवश्यक ती मदत करण्यास तयार आहोत.’ या स्पर्धेतून निवडलेला संघ गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून तुषार आहेर, दुर्गेश जहागीरदार, शाकीर सय्यद, अनिल देवकर, जयदीप पांढरे, निखिल बाविस्कर आणि गौरव गोटे यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईचे तुकाराम म्हेत्रे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
फॉइल मुले - रोहन शहा (प्रथम), तेजस पाटील (द्वितीय), हर्षवर्धन भुमरे (तृतीय), ओम वाघ (चतुर्थ). इप्पी - यश वाघ, रुपेश जाधव, अभिजीत बोराडे, प्रथमेश आहेर. सेबर - श्रेयस जाधव, हर्षवर्धन अवताडे, आदित्य वाहुळ, मयूर ढसाळ. फॉइल मुली - वैदेही लोहिया, गायत्री गोटे, कनक भोजने, यशस्वी वंजारे. इप्पी - योगिनी देशमुख, गायत्री कदम, प्रतीक्षा डोहाळे, उज्वला जाधव. सेबर - कशिश भराड, हर्षदा वंजारे, अक्षदा भवरे, मैत्री तलवदे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.