आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा:इंद्रजित, अर्जुन, वेदिकाला विजेतेपद, स्पर्धेत 80 खेळाडूंचा सहभाग

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने आणि टी.आर.एस फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुली बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत विविध गटात इंद्रजित महिंद्रकर, अर्जुन छल्लानी, विशुद्धी कांबळे, वेदिका झिने आणि राष्ट्रीय खेळाडू साक्षी चव्हाण यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. चेस लँड, पाटोदा येथे झालेल्या स्पर्धेत एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. खुल्या गटात इंद्रजितने सर्वाधिक 6 गुणांची कमाई करत खुल्या गटाचे अजिंक्यपद मिळवले.

त्याचबरोबर, शालेय प्रकारात मिलिंद हायस्कूलच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर स्वामी विवेकानंद स्कूलच्या संघाने उपविजेतेपद राखले. विजेत्या खेळाडूंना प्रायोजक तथा माजी खेळाडू सुदाम झोटिंग, फाउंडेशनच्या सचिव वूमन मास्टर तेजस्विनी सागर आणि अंजली सागर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र, इतर पारितोषीके प्रदान करण्यात आली. सर्व सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सागर म्हणाल्या की,‘युवा खेळाडूंनी औरंगाबादचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. यात मुली खेळाडू मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. मुलांनी देखील चांगली तयारी करुन पुढे यायला हवे आणि आपल्या जिल्ह्याचा गर्व वाढवावा. नवोदित खेळाडूंना मोठी संधी आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही तयार सर्देव आहोत.’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिथुन वाघमारे, मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

विजेते खेळाडू पुढील प्रमाणे

खुला गट - इंद्रजीत महिंद्रकर (प्रथम), श्रृती काळे (द्वितीय), अथर्व सदावर्ते (तृतीय), सुदीप पाटील (चतुर्थ), समृद्धी कांबळे (पाचवी). 7 वर्ष गट - अर्जुन छल्लानी, शौनक शिंदे, अनन्या सोनवणे. 9 वर्ष गट - विशुद्धी कांबळे, अवनी छल्लानी. 11 वर्ष गट - वेदिका झिने, तनुजा भद्रे. 13 वर्ष गट - समृद्धी कांबळे, अनुष्का रामटेके. 15 वर्ष गट - साक्षी चव्हाण, अमृता झोटिंग. उत्तेजनार्थ बक्षीस - संघर्ष शिंदे, शुभांगी लेहणार, स्वरीत पाचगने, सम्यक रामटेके, सार्थक मेश्राम, प्रीती मगर,आणि आदर्श लोखंडे.

बातम्या आणखी आहेत...