आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा:गार्गी, आर्या, भक्ती, अंकिता, देवांग, विनोदला सुवर्णपदक; 16 जणांची आपापल्या गटात शानदार कामगिरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व गरवारे कम्यूनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरिय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत गार्गी भट, देवांग टाकळकर, आर्य जांभळे, शौर्या जांभळे, भक्ती घाटोल, अंकिता भोकरे, विनोद नांगरे यांच्यासह 16 जणांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. गरवारे कम्यूनिटी सेंटर येथे झालेल्या स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेतील विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात झाली आहे. यशस्वी खेळाडूंचे गरवारे कम्यूनिटी सेंटरचे संचालक सुनिल सुतावने, औरंगाबाद जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय कहाळेकर, सचिव सुरेश मिरकर, तांत्रिक अधिकारी छाया मिरकर, रमाकांत रौतलै, शिल्पा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेतील विजयी खेळाडू

बालगट पारंपरिक मुली - गार्गी भट (प्रथम), वैष्णवी शर्मा (दुसरा), आर्या जाभंळे (तिसरा), शौर्या जांभळे (चौथा).)

मुले - देवांग टाकळकर, सुदर्शन गायकवाड, ओम देवरे, सार्थक काकडे.

बालगट मुली - भक्ती घाटोड, आर्या पिलखाणे, हर्षदा पाटील, शिवाणी पवार.

कनिष्ठ गट पारंपरिक मुले - साईराम निंबेकर.

वरिष्ठ गट पारंपरिक मुली - अंकिता भोकरे, नेहा पिठोरे, अनुराधा जगदाळे, तेजस्वीनी शहा.

मुले - विनोद नांगरे, साईचंद्र वाघमारे, संभाजी चव्हाण.

कलात्मक एकल बालगट मुली - गार्गी भट, शर्वरी कुलकर्णी, शौर्या जांभळे, आर्या जाभंळे.

मुले - सुदर्शन गायकवाड, देवांग टाकळकर, अनिकेत पवार.

कलात्मक एकल कनिष्ठ मुली - भक्ति घाटोळ, आर्या पिलखाणे.

कलात्मक एकल वरिष्ठ मुली - प्रियंका बडक.

कलात्मक जोडी कनिष्ठ मुली - भक्ती घाटोळ, गौरी शिराळे व रसिका रूद्रावार, आर्या पिलखाणे.

तालात्मक जोडी बालगट मुली - शौर्या जांभळे वआर्या जाभंळे, शेजल वैष्णव व सांची म्हस्के, सायली इंगळे व श्वेता पैठणकर.

मुले - सुदर्शन गायकवाड व आयुष माडेकर, सम्यक खरात व करण भोपे, आयुष भेंडेकर व नागार्जुन साळवे.

तालात्मक जोडी कनिष्ठ गट मुले - कुणाल मालकर व उदयराज दानवे.

बातम्या आणखी आहेत...