आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी बोर्डाचा निकाल:बारावीच्या निकालात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर; विभागाचा निकाल 99.34 टक्के

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • अशी आहे जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेमका निकाल कसा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रतिक्षेत असलेला हा निकाल मंगळवारी ऑनलाइन दुपारी ४ वाजता जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा निकाल ९९.३४ टक्के लागला असून, जिल्हयाचा निकाल ९९.५३ टक्के लागला आहे. जिल्हानिहाय निकालात औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा रद्द करत इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावी वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण, वर्षभरातील बारावीच्या अंतर्गत् मूल्यमापनातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच बारावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक, अंतर्गत आणि तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण याच्या आधारे गुणदान करत निकाल लावण्यात आल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष आणि सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. यंदा औरंगाबाद विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ४६ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागाचा एकूण निकाल ९९.३४ टक्के लागला आहे.

अशी आहे जिल्हानिहाय आकडेवारी
औरंगाबाद ९९.५३ टक्के, बीड ९९.१७ टक्के, परभणी ९९.३८ टक्के, जालना ९८.९७ टक्के, हिंगोली ९९.८१ टक्के

अशी आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी
यंदा बारावीच्या परीक्षेत ६० हजार २२४ विद्यार्थीनी तर ८५ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्णतेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्णतेची आकडेवारी ९९.८८ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९९.८१ टक्के आहे.

९६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण
दरम्यान यंदा बारावीच्या निकालात सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहिर करण्यात आला असला तरी ९६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर नियमित असलेले २० ते २५ आणि आयटीआयचे ३६ या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. असेही पुन्ने यांनी सांगितले.

६३२ दिव्यांग विद्यार्थी यशस्वी
तसेच यंदाच्या निकालात औरंगाबाद विभागातून ६३२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ४२ पुर्नपरीक्षार्थी तर ५९० नियमित विद्यार्थी आहेत.

३४६ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ
यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कला आणि क्रीडात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जो सवलतीच्या गुणांचा लाभ मिळतो त्या संख्येत घट झाली आहे. कारण कोरोनामुळे यंदा क्रीडास्पर्धा होवू शकलेल्या नाहीत. त्यामुळे सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्तावही कमी होते. यंदा ३४६ विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला आहे. त्यात औरंगाबादमधून सर्वाधिक १९३, बीड ४, परभणी ७९, जालना ७० आदी प्रस्ताव आले होते. तर हिंगोली जिल्हयातून एकही प्रस्ताव आला नाही.

बातम्या आणखी आहेत...