आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा तायक्वांदो संघटनेतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत विविध गटात कृष्णा अदहत, रणवीर चव्हाण, अद्वैत पारपेल्ली, श्रृती दीपके, सोनल बोर्डे, अनुष्का जैन यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
विद्यार्थ्यांचे झाले कौतुक
ही स्पर्धा सबज्युनिअर, ज्युनिअर व कॅडेट गटात व क्युरेगी प्रकारात खेळवण्यात आली. विजेत्या खेळाडूंना भाजपचे शहर जिल्हा सचिव शंतनू उऱ्हेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.‘खेळामुळे तरुण पिढी सशक्त व निरोगी राहते. सशक्त पिढीमुळे देश मजबूत बनतो. प्रत्येकाने एकतरी खेळ खेळायला हवा. खेळ व खेळाडूंसाठी जी काही मदत लागेल, ती मी वैयक्तिक व पक्षाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल, असे उऱ्हेकर यांनी सांगितले.’याप्रसंगी प्रा. भरत सलामपुरे, सचिंदर रॉय, श्रीपाद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय शिंगारे, ऋषिकेश अपोनारायण, नयन तिवारी, मोहित देशपांडे, रुपेश शिंदे, संकेत व्यवहारे, संकेत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
विजेते खेळाडू
शंभुराज चव्हाण, सत्यम कोपकवाड, दक्ष जाधव, कृष्णा अडहत, स्वराज लटपटे, राघवेंद्र जगताप, रोहित सुतार, वेदांत शेटे, आयुष निसर्गंध, रणवीर चव्हाण, युवराज शेळुकर, अनुष्का जैन, फझल रोलिम खान, आयुष शिरसाठ, सुमित ढोने, ऋषिकेश क्षिरसागर, अमित नाईक, चैतन्य साळुंके, साई काटकडे, प्रथमेश केवडे, पवनकुमार सोनवणे, अदिश रोटे, हर्षवर्धन गायकवाड, तनिष्का शर्मा, मेघा बन्साळी, श्रेया गंधे, भक्ती धुत, सरस्वती रोंगे, तन्वी पागोरे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.