आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदलात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरे:पानेर येथे धरणात पोहाण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडुन मुत्यु

औराळा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आकाश आप्पासाहेब शेलार (वय 16) कन्नड तालुक्यातील चापानेर येथील रहिवाशी आहे

कन्नड तालुक्यातील चापानेर येथील आकाश आप्पासाहेब शेलार (वय 16) हा सकाळी आपल्या मित्रासोबत गावाजवळील धरणात पोहण्यास गेला आणि त्याचा पाण्यात बुडुन मुत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आकाशला सैन्यदलात जाण्याची खुप इच्छा असल्याने तो रोज पहाटे आपल्या मित्रांसोबत व्यायाम करण्यासाठी जात असत. शनिवारी सकाळी ही रोजच्या नित्यनेमाने तो आपल्या मित्रांसोबत पहाटे व्यायाम करण्यासाठी तो गेला. येतांनी आपण आज पोहायला जाऊ पोहायचा व्यायाम सर्व व्यायामपेक्षा चागंला असतो या भावनेने तो त्याच्या मित्रांसोबत गावाजवळील धरणात पोहायला गेला. त्याला पाहिजे तेवढे पोहाता येत नसल्याने तो धरणाच्या भिंतीच्या कडेकडेने हळूहळू पोहत होता.

परंतु कन्नड ते भराडी या रस्त्याच्या कामासाठी लागणारे मुरुम, माती ठेकेदाराने या धरणातुन काढल्याने धरणात ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे झाले आहे. त्या खड्ड्यातील खोल पाण्याचा अंदाज आकाशला न आल्याने तो अचानक पाण्यात बुडायला लागला व इतर मित्रांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिक धरणावर जमा झाले. मोठी कसरत करून नागरिकांनी आकाशला बाहेर काढले. त्याच गंभीर अवस्थेत कन्नड येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच आकाशची जीवनज्योत मावळली. घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मिळताच बीट जमादार गणेश जैन, बीट जमादार सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुतदेह कन्नड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.

कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर एक वाजेच्या सुमारास चापानेर येथील सार्वजनिक स्माशानभुमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाश याचा गावाच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात नेहमीच सहभाग असायचा त्याच्या असे अचानक जाण्याने गावातील परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त होते आहे.

कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनिल नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश जैन, व सोनवणे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...