आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रीडा कार्यालय व औरंगाबाद जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत समीर गौस खान, क्रिश आडे, सत्यम प्रजापती, श्रीकृष्ण रुईकर, प्रिया घुसिंग, कोमल रहाणे यांनी शानदार कामगिरी करत आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत 120 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या खेळाडूंची बीड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात निवड झाली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सदानंद सवळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्केटिंग संघटनेचे भिकन आंबे, वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव दीपक रुईकर, क्रीडा मार्गदर्शक आशिष कानडे, सुदर्शन चव्हाण, योगेश जाधव यांची उपस्थिती होती. स्पर्धेत पंच म्हणून तुषार सपकाळे, वरून दीक्षित, भाऊसाहेब खरात यांनी काम पाहिले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
17 वर्ष मुले - 49 किलो उझैर शेख (प्रथम), शुभम राठोड (द्वितीय). 55 किलाे - समीर गौस खान, आदिल असिफ पठाण. 61 किलो - क्रिश आडे, उमेश तमखाने, शहानवाज अली. 67 किलो - श्रीयोग पोंधे, दीपक बनकर. 73 किलो - सत्यम प्रजापति, रेहान खान. 81 किलो - चिन्मय नेहते. 89 किलो - श्रीकृष्ण रुईकर, विशाल साळुंखे. +102 किलो - ओवेस बेग, यश कोपसे. मुली - 49 किलो - प्रिया घुसिंग. 55 किलो - नीला मोहिते. 71 किलो - सेजल वैष्णव. 76 किलो - श्रेया राजवन.
19 वर्ष मुले : 55 किलो - समाधान भोसले, हुझैफा शेख. 61 किलो - पवन बागुल, मिर्झा जे. 67 किलो - अक्षय साळुंखे. 73 किलो - अभय इखारे. 81 किलो - दीपक गावंडे, वैभव जाधव, हमजा अन्सारी. 89 किलो - वृषभ नवगिरे. 102 किलो - अंकुर कुमार तिवारी. +109 किलो - अक्षय जारवाल. मुली :45 किलो - कोमल राहणे.49 किलो - नेहा पवार. 55 किलो - कीर्ती फुलारे, आकांक्षा काकडे. 59 किलो - राधा साळुंखे. 64 किलो - प्रणोती आघाडे. 71 किलो - सानिका झरेकर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.