आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा वेटलिफ्टिंग संघ जाहीर:कोमल, समृद्धी, हर्षल, सत्यम, अक्षयसह 27 जणांना सुवर्णपदक

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेतर्फे आयोजित जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेत कोमल राहणे, समृद्धी भवर, हर्षल पाटील, सत्यम प्रजापती, अक्षय सिंह हजारीसह एकूण 26 खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत एकूण 110 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची रावेर (जळगाव) 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात निवड झाली आहे. स्पर्धेत पंच म्हणून तुषार सपकाळे, वरुण दीक्षित, भाऊसाहेब खरात यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

धनश्रीने उचलले 120 किलो वजन

स्पर्धेत मुलींच्या कनिष्ठ गटात युवा खेळाडूंनी धनश्री रोघेने सर्वाधिक एकूण 120 किलाे वजन उचलले आणि मुलींमध्ये शिवा शिंदेने 205 किलो वजन उचलून सर्वोत्कृष्ट लिफ्टरचा बहुमान पटकावला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष राजू वैद्य, माजी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, छाया रूईकर, राजेंद्र जाधव, जिल्हा सचिव दीपक रुईकर, सुदर्शन चव्हाण आदींनी अभिंनदन केले.

अंतिम निकाल पुढील प्रमाणे

युथ मुली : 40 किलो - कोमल राहणे (प्रथम), धीमही सावंत (द्वितीय). 49 किलो - वैष्णवी पीठे. 55 किलो - समृद्धी भवर, नेहा पवार, राधा साळुंखे. 59 किलो - अनुष्का जाधव, तेजस्वी उतेकर. 65 किलो - वैष्णवी सोनवणे, केतकी उरेकर. 71 किलो - सानिका झरेकर. 81 किलो - निकिता वाघ. कनिष्ठ गट 49 किलो - धनश्री रोंघे. 64 किलो - वैष्णवी सोनवणे. वरिष्ठ गट 49 किलो - धनश्री रोंघे. 55 किलो - ऋतिका कांबळे. 59 किलो - साक्षी जैस्वाल. युथ मुले : 49 किलो - हर्षल पाटील, अभिषेक आटपळे. 55 किलो - पवन बागुल, समाधान भोसले, पियुष रुईकर. 61 किलो - रोहित ननावरे, करण लोखंडे. 67 किलो - यश मिरगे, अभय ईखारे, अक्षय साळुंखे. 73 किलो - सत्यम प्रजापती, दरवेश झिलटे. 81 किलो - वैभव जाधव, पवन सोनवणे. कनिष्ठ गट : 55 किलो - हर्षल पाटील, तुषार महाजन. 61 किलो - वैभव पांडव, पीयूष रुईकर. 67 किलो - अश्वजीत तायडे. 73 किलो - अलोक खूपसे, प्रथमेश चौधरी. 102 किलो - शिवा शिंदे, नेत्रांजन पाटील. वरिष्ठ गट : 61 किलो - आकाश पचलोरे. 81 किलो - नयन जाधव. 89 किलो - अक्षय सिंह हजारी. 102 किलो - नेत्रांजन पाटील.

बातम्या आणखी आहेत...