आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्गाचा कहर:बाधितांची एकूण संख्या ६१,४३५, पैकी ७५५२ रुग्णांवर उपचार सुरू; कोरोनाचे १३३५ नवे रुग्ण, १८ मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्यांना दंडाचा धाक, विनामास्क नेते मंडळींना मात्र अभय

जिल्ह्यात कोरोना कहर आणखी वाढला असून बुधवारी तर १३३५ नवे बाधित रुग्ण आढळले. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये घाटी रुग्णालयात अकरा तर खासगी रुग्णालयांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी १७ जण औरंगाबाद जिल्ह्यातील तर बुलडाणा जिल्ह्यातील एका ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१,४३५ झाली असून मृतांचा आकडा १३६८ वर पोहोचला आहे. बुधवारी मनपा हद्दीतील ३५७ व ग्रामीणमधील ८५ अशा ४४२ जणांना सुटी देण्यात आली. यामुळे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांची एकूण संख्या ५२५१५ झाली आहे. ७५५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात ९६२ रुग्ण : बुधवारी शहरात ९६२ तर ग्रामीण भागात ३७३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पानदरिबा (4), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह (1), अयोध्यानगर (1), बंजारा कॉलनी (1), सातारा परिसर (15), देवगड औरंगाबाद (1), टीव्ही सेंटर (3), न्यू विशालनगर (3), म्हाडा कॉलनी (2), एन-5 (12), हनुमाननगर (10), चिकलठाणा (8), जयभवानीनगर (7), एमजीएम होस्टेल (2), एन-1 (6), एन-6 (1), इंदिरानगर (2), एन-2 (10), मयूर पार्क (2), विजयनगर (1), लेबर कॉलनी (1), मुकुंदवाडी (11), संजयनगर (2), गारखेडा (16), जाधववाडी (1), राजनगर (5), रोकडिया हनुमान कॉलनी (2), प्रभानगर (1), सारा सिटी पैठण रोड (1), देवानगरी (1), बीड बायपास (16), टिळकनगर (1), शिवाजीनगर (13), कैलासनगर (1), सुराणानगर (1), सेव्हन हिल्स (1), आकाशवाणी (2), एन-9 (4), हर्सूल (1), पुंडलिकनगर (7), एन-12 (21), हडको कॉर्नर (1), पहाडसिंगपुरा (1), सिद्धी पार्क सारा वैभव (1), आंबेडकरनगर (1), विश्रांतीनगर (2), जयभवानीनगर (3), राजीव गांधीनगर (1), विठ्ठलनगर (1), उत्तरानगरी (2), शहानूरवाडी (2), अंबिकानगर (1), नंदीग्राम सोसायटी (1), पार्वतीनगर (1), एन-4 (7), सूतगिरणी चौक (4), न्यू कॉलनी (1), ठाकरे कॉलनी (1), छत्रपतीनगर (1), गजानननगर (4), टाऊन सेंटर (1), ब्रिजवाडी (1), मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी (1), विद्याधन कॉलेज (1), देवळाई (3), अशोकनगर (1), एन-3 (1),राजाबाजार (3), सराफा बाजार (2), श्रेयनगर (5), छावणी (4), ज्योतीनगर (6), औरंगाबाद (2), उल्कानगरी (9), बालाजीनगर (3), बेगमपुरा (1), पडेगाव (4), पेठेनगर (1), पदमपुरा (9), नवाबपुरा (1), गरमपाणी (1), गुलमंडी (1), बिस्मिल्ला कॉलनी (1), रेल्वेस्टेशन (5), एम्स हॉस्पिटल (2), वेदांतनगर (3), सिडको (1), दर्गा रोड (1), चिश्तिया कॉलनी (1), एकनाथनगर (1), शहानूरवाडी (1), इटखेडा पैठण रोड (3), सारा गार्डन आशीर्वाद रो हाउसेस (1), स्वामी विवेकानंदनगर (2), जानीपुरा (1), सिंधी कॉलनी (3), रामनगर (1), खाराकुवा (1), नागेश्वरवाडी (3), उस्मानपुरा (16), मिटमिटा (1), खोकडपुरा (1), सन्मित्र कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), आदित्यनगर (3),गुरुरामदासनगर (1), भीमनगर भावसिंगपुरा (2), समर्थनगर (2), चेलीपुरा (5), न्यू नंदनवन कॉलनी (2), मारुतीनगर (1), चिंतामणी कॉलनी (1), एसबीआय (3), दशमेशनगर (2), पैठण गेट (1), अमृतसाई प्लाझा (1), बन्सीलालनगर (5), कांचनवाडी (4), एमआयडीसी कॉलनी (3), पोदार इंटरनॅशनल स्कूल (1), कासलीवाल मार्व्हल (1), एस.बी.कॉलनी (1), अमृतसाई सारा सिटी (1), उस्मानपुरा म्हाडा कॉलनी (4), गाढेनगर (1), रामानंद कॉलनी (2), क्रांतीनगर (1), म्हसोबानगर हर्सूल (2), सुदर्शननगर हडको (1), मयूर पार्क (2), भगतसिंगनगर (1), आरोग्यम हॉस्पिटल (1), राजे संभाजी कॉलनी हर्सूल (1), होनाजीनगर हर्सूल (2), एन-11 (1), निसर्ग कॉलनी भावसिंगपुरा (1), आदित्यनगर हर्सूल (1), पॉवरलूम एमआयडीसी चिकलठाणा (1), कटकट गेट शरीफ कॉलनी (2), भवानीनगर जुना मोंढा (1), लेबर कॉलनी (1), सौदामिनी हाउसिंग सोसायटी (1), स्वरूप कॉलनी सिडको (1), संकल्पनगर हडको (1), मेहेरनगर (2), शिवशंकर कॉलनी (1), मित्रनगर (1), औरंगपुरा (1), विजय चौक (1), प्रतापनगर (1), भानुदासनगर (1), बंबाटनगर (1), गिरिजादेवी हाउसिंग सोसायटी (1), बाळापूरनगर (1), देशमुखनगर (1), दिशा संकुल शिवाजी चौक (6), मातोश्री नगर (1), गुरुसहानीनगर (1), साईनगर (2), वसंत विहार (2), आदर्श कॉलनी (1), एन-7 (7), एन-8 (2), आईसाहेबनगर हर्सूल (1), आनंदनगर (1), श्रेयसनगर (1), केंब्रिज चौक (2), नक्षत्रवाडी (4), समतानगर (1), साईकृष्ण अपार्टमेंट पैठण रोड (1), राहुलनगर (2), पन्नालालनगर (2), दिशा संस्कृती पैठण रोड (1), रचनाकार कॉलनी (1), विद्यापीठ परिसर (1), राजूनगर (1), अजबनगर (1), पारिजातनगर (2), रामानंद कॉलनी (1), श्रीकृष्णनगर दर्गा (1), गौतमनगर (1), जवाहर कॉलनी (1), शाकारनगर (1), एमजीएम स्पोर्ट‌्स बिल्डिंग (1), उद्योग शेंद्रा बीबीपी (1), एमजीएम स्टाफ (1), अन्य (480). ग्रामीण रुग्ण : रांजणगाव शेणपुंजी (1), बिडकीन (1), शेंद्रा (2), पिसादेवी (2), जैतपूर (1), हिरापूर साईनगर (1), जोगेश्वरी वाळूज (2), रांजणगाव (4), खुलताबाद (1), हसनाबाद कन्नड (1), पिशोर कन्नड (2), पैठण (3), जयहिंदनगरी पिसादेवी (2), सावंगी हर्सूल (1), बजाजनगर (23), पाटोदा (1), कमलापूर (1), सिडको महानगर (11), वडगाव (5), सलामपुरे वडगाव (4), एमआयडीसी वाळूज (2), गंगापूर (2), गांधेली (1), आडगाव बुद्रुक (1), रवींद्रनगर (1), अन्य (297) रुग्ण. विनामास्क फिरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातही दंड ठाेठावला जात अाहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अाराेग्य सभापती अविनाश गलांडेंसह इतर अनेक नेते वैजापूरच्या मेळाव्यात विनामास्क भाषण देत हाेते. त्यांना दंड ठाेठावण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित लाेकांमधून विचारला जात हाेता.

९ मार्चपासून वाढता आलेख
९ मार्च रोजी औरंगाबादमध्ये ५५० रुग्ण, त्यानंतर १० मार्च रोजी ५३२ रुग्ण, अकरा मार्च रोजी ९३०, बारा मार्च रोजी १३२६, त्यानंतर १४ मार्च रोजी १३३४, तर १४ मार्च रोजी १०२३ रुग्ण होते. १५ मार्च रोजी ही संख्या ११२८ वर तर १६ मार्च रोजी १२७१ रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी १७ मार्च रोजी १३३५ रुग्ण आढळले. पाच हजारपेक्षा अधिक चाचण्या औरंगाबादमध्ये पाच हजारपेक्षा आधिक चाचण्या रोज करण्यात येत आहेत. यामध्ये १४ मार्च रोजी ६१८६ चाचण्या जिल्ह्यात करण्यात आल्या होत्या. तर, १६ मार्च रोजी ५५८२ चाचण्या करण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...