आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Division Results 94.97 Per Cent In 12th Examination Aurangabad District First, Beed Second And Jalna Third; The Girls' Spectacles In The Result

विभागाचा निकाल 94.97 टक्के:12 वी परीक्षेत औरंगाबाद जिल्हा अव्वल, तर बीड दुसर्‍या क्रमांकावर; यंदाही सुकन्यांचा दबदबा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘ऑनलाइन’ स्वरुपात जाहीर केलेल्या निकालात औरंगाबाद विभागीय मंडळातून औरंगाबाद जिल्ह्याने बाजी मारली. या जिल्ह्याचा निकाल 96.48 टक्के लागला. बीड जिल्हा दुसर्‍या, तर जालना जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर राहिला. हिंगोली आणि परभणी हे जिल्हे मात्र पिछाडीवर राहिले.

कडक कॉपीमुक्तीचा परिणाम

औरंगाबाद विभागात या वर्षी कॉपीमुक्ती अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे निकाल घसरणार अशी अपेक्षा होती. मात्र, निकाल यापेक्षा उलट लागला. औरंगाबाद विभागाचा निकाल 94.97 टक्के लागला. गेल्यावर्षीपेक्षा औरंगाबाद विभागाचा निकाल 4.37 टक्क्यांनी घसरला असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली.

इंटरनेट कॅफेंवर गर्दी

औरंगाबाद विभागातून 1 लाख 64 हजार 263 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी 1 लाख 56 हजार 015 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींनी बाजी मारली असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 95. 75 टक्के आहे. बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा मोकळ्या होतात. त्यामुळे निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांत सकाळपासूनच उत्सुकता होती. विद्यार्थ्यांनी निकाल जाणून घेण्यासाठी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली होती. अनेकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. महाविद्यालयांत गटागटाने जाऊन अनेकांनी निकाल बघून जल्लोष केला.

विभागाची जिल्हानिहाय टक्केवारी

औरंगाबाद - 96.48 टक्के

बीड - 95.09 टक्के

परभणी - 93.25 टक्के

जालना - 93.98 टक्के

हिंगोली - 93.97 टक्के

एकूण - 94.48 टक्के

विभागाचा शाखानिहाय निकाल

विज्ञान - 97.94 टक्के

वाणिज्य - 94.39 टक्के

कला - 91.40 टक्के

एचएससी व्होकेशनल - 91.34 टक्के

टेक्निकल सायन्स - 53.44 टक्के

एकूण निकाल - 94.97 टक्के

बातम्या आणखी आहेत...