आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल:औरंगाबाद विभागाचा निकाल 96.94 टक्क्यांवर, मराठवाड्यात उस्मानाबाद अव्वल; निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस

औरंगाबाद / लातूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल ९६.९४ टक्के तर लातूर विभागाचा निकाल ९७.२७ इतका लागला. मागील वर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागाचा निकाल ३.०१ टक्के कमी लागला असून २०२१ मध्ये तो ९९.९५ टक्के इतका होता. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा आठही जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत उतीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे.

औरंगाबाद विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ७९ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७७ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १ लाख ७० हजार ८३१ जण उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी विभागातून एकूण ९८ हजार ९०० विद्यार्थी तर ७८ हजार ४२७ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी ७६ हजार ५४९ विद्यार्थिनी तर ९४ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.३३ टक्के आणि विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९७.६० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उतीर्णतेची टक्केवारी कमी आहे.

जिल्हानिहाय निकाल टक्क्यांत
औरंगाबाद 97.01
बीड 97.20
परभणी 95.37
जालना 95.44
हिंगोली 94.77
लातूर विभाग
नांदेड 96.68
उस्मानाबाद 97.84
लातूर 97.63

२८६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला
यंदा बीड जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला असून जिल्ह्याचा निकाल ९७.२० टक्के लागला आहे. सन २०२० च्या तुलनेत जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५.९६ टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यातील २८६ शाळांचा निकाल १००% लागला असून जिल्ह्यात वडवणी तालुका पहिला आला आहे. जिल्ह्यात ३९ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लातूर विभागामध्ये ९७.२७ टक्के विद्यार्थ्यांनी मारली बाजी

मुला-मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण
जिल्हा मुले मुली
औरंगाबाद 96.20 97.99
बीड 96.61 98.02
परभणी 93.78 97.36
जालना 94.31 96.86
हिंगोली 92.99 96.86
नांदेड 94.83 97.52
लातूर 96.52 98.06
उस्मानाबाद 96.52 97.92
निकाल लागल्यानंतर औरंगाबाद शहरात मुलींनी असा जल्लोष केला. छाया : मनोज पराती.

हिंगोली तळाला मुले-मुली उत्तीर्ण होण्याची मराठवाड्यातील टक्केवारी पाहिली तर हिंगोली जिल्ह्यात मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी कमी आहे. तर लातूर जिल्ह्यात मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

लातूर विभागात १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थी झाले उतीर्ण
औरंगाबाद विभागात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे १२०८७ विद्यार्थी आहेत. तर लातूर विभागात ही संख्या ११०८४ इतकी आहे.लातूर विभागात नांदेड, उस्मानाबाद, लातूर या तिन्ही जिल्ह्यांत मिळून १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गतवर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागाचा निकाल ३.०१%कमी

बातम्या आणखी आहेत...