आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फीबाच्या मान्यतेने आयोजित पहिल्या महाबास्केट 3 ऑन 3 मराठवाडा विभागीय बास्केटबाॅल स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावत बीड संघाने दुहेरी मुकुट मिळवला.
मुलींच्या कनिष्ठ गटात नांदेड बॉलर्स संघाने विजेतेपद पटकावले. यजमान छत्रपती संभाजीनगरच्या एमएसएम संघ आणि औरंगाबाद चॅम्पिसन्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एमएसडी व पोद्दार सीबीएसई संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. कनिष्ठ गटाच्या फायनलमध्ये बीडने एमएसएमचा १०-६ बास्केटने पराभव करत जेतेपद मिळवले. विजेत्या संघाकडून साहिल धनवटे, सोमनाथ कर्डीले, साहिल सय्यद यांनी एकतर्फी उत्कृष्ट कामगिरी केली. एमएसएमच्या यश वाघमारे, प्रणव कोळेश्वर, पार्थ मुनगे यांचे प्रयत्न अपुरे पडले. विजेत्या संघांचे संघटनेचे अध्यक्ष गणेश कड, सचिव मनजीत दरोगा, प्रशांत बुरांडे, सचिन तत्तापूरे आदींनी अभिनंदन केले.
नांदेडने चॅम्पियनला हरवले
कनिष्ठ मुलींच्या अंतिम लढतीत नांदेड बॉलर्सने औरंगाबाद चॅम्पियन संघाचा अनपेक्षितरित्या ६ विरुद्ध ५ बास्केटच्या फरकाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नांदेडच्या कीर्ती डोंगरे, टीना रिन्दकवाले, पल्लवी भालेराव, सौंदर्य भालेराव यांनी अचूक पासेस करत संघाला विजयी केले. चॅम्पियनतर्फे प्रतीक्षा बरेतीये, कृष्णा गायकवाड, वैष्णवी चौधरी यांनी निकारातही लढत दिली.
बीडने चॅम्पियनला नमवले
पुरुष गटाच्या अंतिम लढतीत बीड अ संघाने चॅम्पियन अ संघावर २१-१३ बास्केट गुणांनी मात करत अजिंक्यपद पटकावले. बीडकडून सचिन इटकरी, अजय पवार, स्वप्नील ढोबळे यांनी प्रेक्षणीय खेळ केला. चॅम्पियन संघातर्फे राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी, नरेंद्र चौधरी, अजय सोनवणे व अभिजित अंभोरे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. या गटात नांदेड बाॅलर्स संघ तिसऱ्या आणि चॅम्पियन ब संघ चौथ्या स्थानावर राहिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.