आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शिक्षण विभागाची बनवाबनवी की 'डबल गेम'! आधार लिंकमध्ये सापडली 7 हजार 486 विद्यार्थ्यांची दोनवेळा नावे, केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश

औरंगाबाद18 दिवसांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • पावसामुळे 56 शाळा खोल्यांचे नुकसान

शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम मोठया प्रमाणावर सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ७ हजार ४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, संबंधित केंद्र कारवाई करण्याचे आदेश जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिले.

शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचे आधार लिंक करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच ७ हजार ४८६ विद्यार्थ्यांची दोन ठिकाणी नावे असल्याचे आढळून आले आहे. म्हणजे जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये ही नावे असल्याचे जि.प. गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघडकीस आले. पटसंख्या वाढवून शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी हा बनवाबनवी अन् ‘डबल गेम’ खेळण्यात येत आहे का? दरम्यान यामुळे जवळपास 250 शिक्षकांची पदे वाचलेली आहेत. आता डबल नावे असल्यानंतर 250 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. दरम्यान हा डबल गेम करण्यासाठी शिक्षण विभागाचे कोण जबाबदार आहेत. याचा शोध सुरू असल्याचे गलांडे यांनी सांगितले.

या संदर्भात केंद्र प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आलेला असून, तो समाधानकारक आला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गलांडे यांनी बैठकीत दिले. दरम्यान गावात असताना एक आधार आणि उसतोडीसाठी किंवा अन्य कामासाठी बाहेरगावी गेल्यावर त्याठिकाणीही आधारची नोंदणी करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पटसंख्या वाढवून खाजगी संस्थांच्या शाळा व शिक्षकांची संख्या टिकविण्यासाठीच हा डबलगेम करण्यात आला असावा, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...