आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा" सॉरी मॅडम मी तुमच्याशी खोट बोललो, पाणी मी सांडल होतं, खोडीपण मीच केली होती पण दुसऱ्याचे नाव तुम्हाला सांगितले ,' तर सॉरी मुलांनो आजवर पालकांना आम्हीच सांगत आलो की मुला-मुलांची एकमेकांसोबत तुलना करु नका. पण वर्गात शिकवतांना मी तुमची त्या दिवशी तुलना केली. ही काही प्रातिनिधिक आत्मचिंतन शाळेत बसवण्यात आलेल्या पेटीतून समोर आली आहे.
विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडूनही आत्मचिंतन
चूक नसतानाही एखाद्या व्यक्तीला विनाकारण रागावणे, चिडचिड करणे हा प्रकार लक्षात आल्यावर पश्चात्ताप होतो. अशा वेळी काय करावे हे सूचत नाही. स्वतः माफी मागावी असे ठरवले तर ते काही वेळा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत आत्मचिंतन करून चूक सुधारण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत आता शाळांमध्ये "आत्मचिंतन पेटी' बसवण्यात आली आहे. जवळपास पन्नास ते साठ शाळांमधील काही चिठ्ठ्या पेटीतून काढून पाहिल्या असता यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील त्यांच्या चुका कबुल करत आत्मचिंतन केल्याचे समोर आले आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
माझ्याकडून ती बॅट खराब झाली
या आत्मचिंतन पेटीचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही होत आहे. आत्मचिंतन पेटी उघडली असता त्यात सरांना खेळायला दिलेली बॅट माझ्याकडून पडली व खराब झाली ही बाब मी सरांना सांगितली नाही सॉरी सर..., पिण्याचे पाणी माझ्याकडून मैत्रिणीच्या बॅगवर सांडल्याने आमच्या दोघींची भांडण झाले, ते मी मॅडमला सांगितले नाही सॉरी मॅडम..., माझ्याकडून मॅडमची वही हरवली, मी ते मॅडमला सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी नविन वही आणली, सॉरी मॅडम अशा अनेक चुका विद्यार्थ्यांकडून आत्मचिंतन पेटीच्या माध्यमातून मान्य केल्या आहेत.
''या उपक्रमाचा उद्देश कुणालाही त्यांच्यातील गुण-दोष दाखवणे असा नाही. तर आपल्या कामात, वर्तनात सुधारणा व्हावी. यासाठी आत्मचिंतन पेटीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.'' - जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.