आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंची घोषणा:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ; कुलगुरूंची घोषणा, कॉलेजांना आवाहन करणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फक्त दुष्काळग्रस्तांचा डेटा आहे

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. अधिसभा सदस्य अॅड. संजय काळबांडे यांनी अधिसभेत ही मागणी केली. त्याला इतरांनी पाठिंबा दिला. यावर कुलगरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ कॅम्पसमधील विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा केली.

११ परकीय भाषा अभ्यासक्रमांचे शुल्क ८०० वरून १० हजार रु. केल्याच्या ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर विद्यार्थी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली होती. याचे पडसाद अधिसभेत उमटले. कुलगुरूंनी २०२१-२२ या वर्षासाठी केलेली शुल्कवाढ मागे घेत असल्याचे जाहीर केले. महाविद्यालयांनीही अशी शुल्कमाफी द्यावी म्हणून संबंधितांना आवाहन करणार असल्याचे ते म्हणाले.

फक्त दुष्काळग्रस्तांचा डेटा आहे
कुलगुरू म्हणाले, ‘कोविडमुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शुल्कमाफी दिली होती. २०१९-२० दरम्यान अतिवृष्टीग्रस्तांच्या पाल्यांना माफी दिली होती. अशी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे. नव्या विद्यार्थ्यांच्या उत्पन्नावरूनही कळते. त्यामुळे ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना शुल्कमाफी दिली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनीही शैक्षणिक शुल्क घेऊ नये म्हणून आवाहन करणार आहोत.’

बातम्या आणखी आहेत...