आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:फसलेेला पांडेय पॅटर्न, झोपलेेली महापालिका अन‌् आयुक्त सुस्त; नियम धाब्यावर, मोकाट जनता मस्त

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोना तोच, आयुक्त तेच, पण कारभार मात्र भिन्न. निवडणूक न झाल्याने महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय हेच शहराचे प्रशासक आहेत. पण गेल्या वेळचे नियोजन आणि उपाययोजना या वेळी मात्र औषधालाही सापडत नाहीत. लसीकरण असो वा तपासण्या, औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराचे सर्वच पातळ्यांवर वाभाडे निघाले आहेत.

एकीकडे रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना महापालिका प्रशासकांचे गर्दीवरील नियंत्रण सुटले आहे. शहरात २६ कंटेनमेंट झोन आहेत, पण तेथे कोणतीच बंधने लावण्यात आलेली नाहीत. ना पॉझिटिव्ह रुग्णांचे ट्रॅकिंग होतेे ना त्यांच्या नातेवाइकांचे टेस्टिंग. संसर्ग होणारे रुग्ण स्वत:हून चाचण्या करून रुग्णालयांकडेे धाव घेत आहेत. दिवसागणिक हजार-दीड हजार रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत शहरात ६५ हजार २१६ जणांना काेरोना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी नियमांचे काटेकाेर पालन करणारे हेच प्रशासन या लाटेत मूलभूत गाेष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.

अक्षम्य चुका
नियंत्रणात कुचराई : क्वाॅरंटाइन, ट्रेसिंग, टेस्टिंगचे काेणतेही नियम पाळले जात नाहीत. रुग्णांसाठी, तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांचा संपर्क इतरांशी वाढून रुग्णसंख्या वाढत गेली.
नियमांना कचऱ्याची टोपली : गेल्या वर्षी प्रत्येक दुकानदाराला ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल गनने तपासणी अनिवार्य केली होती. तपासणीही होत होती. आता सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

गेल्या वेळी पास, या वेळी नापास
मोजक्याच रुग्णांची नोंदणी
: मनपाने २५ ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था केली आहे. तेथे अँटिजन टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरमध्ये नेले जाते, मात्र आरटीपीसीआर करणाऱ्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्यामुळे दरम्यानच्या काळात पाॅझिटिव्ह व्यक्ती सुपरस्प्रेडर ठरते आहे.
कंटेनमेंट झाेन नावालाच : तीच गत कंटेनमेेंट झोनबाबतही दिसते. शहरात कंटेनमेंट झाेन तयार करण्यात आले, मात्र तेे सील करण्यात आले नाहीत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळूनही कोणाचे बंधन नाही. हे कंटेनमेंट झोनच सुपर स्प्रेडर बनताना दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...