आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवारी धुक्यांमुळे औरंगाबाद - दिल्ली विमान सेवा विस्कळीत झाली. औरंगाबादची एक फ्लाईट उशिराने आली तर दाट धुक्यामुळे एक रद्द झाली. यामुळे प्रवाशांचे देखील हाल झाले. वेळेचा अपव्यय झाला व कामाचे नियोजन देखील हुकले. मात्र, प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने या सर्व बाबी गौण आहेत.
हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली की अत्यल्प थंडी राहते. तर दिर्घकाळ उष्ण दिवस राहात आहेत. यामुळे कमालीचे अस्थिर वातावरण निर्मिती होत आहे. गत चार दिवसांपासून अतिशीत वारे वाहून येत आहेत. याच आकाशात ढग घोंगवतात. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, काश्मीर सारखे दाट धुक्यांची पांढरी चादर पसरत आहे. यामुळे एक हजार मीटर लांब अंतरावरील काहीच दिसत नाही. अशा प्रकारचे अतिदाट धुके असल्याने विमान उड्डाणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. परिणामी शुक्रवारी इंडिया एअरलाईन्सची औरंगाबाद दिल्ली एक उड्डाण रद्द झाले. तर एक फ्लाईट लेट झाली. वाहन चालकांना दिवे लावून वाहन चालवावे लागले. कामानिमित्त आणि जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी. दाट धुक्याचा सुखद अनुभव घेतला.
धुक्याचे परिणाम
धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. तसेच मानवी आरोग्यावर आणि फळपिकांवर विपरीत परिणाम होत आहे. शाळू ज्वारीवर चिकटा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मानवाला श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे अल्हादायक वाटणारे वातावरणात नाका तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडणं उचित ठरेल.
दुपारी 2 नंतर वातावरण निवळले
दुपारी 1.30 वाजेपर्यंत दाट धुके पसरले होते. त्यानंतर सूर्यदर्शन झाले व धुक्याची तीव्रता कमी झाली होती. हवाई दळणवळणाच्या मार्गातील अडथळा दूर झाला होता. पुढील दोन दिवस धुक्याची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.