आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad From 17th To 20th November, State Level Agricultural Exhibition With Participation Of Various Companies Including Agriculture, Ancillary Industries, Seminars For Farmers.

औरंगाबादेत 17 ते 20 नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन:शेती, पूरक उद्योग, कंपन्यांचा सहभाग, चर्चासत्रेही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अ‌ॅनग्रिकल्चर, राज्य व केंद्र कृषी विभाग व सियाम यांच्या संयुक्त विद्यमाने महाअ‌ॅग्रो या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन औरंगाबादेत होणार आहे. 17 ते 20 नोव्हेंबर याकाळात ते होईल अशी माहिती मुख्य समन्वयक अ‌ॅड. वसंत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

17 नोव्हेंबर रोजी मान्यवर मंत्री कुलगुरू कृषी विद्यापीठ परभणी , आमदार, जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता पैठण रोडवरील कृषी तंत्र विद्यालय व केव्हीके च्या प्रांगणात प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

मध्य महाराष्ट्रातील हे एकमेव मोठे कृषी प्रदर्शन असून हे सातवे पर्व आहे. शेतक-यांना केंद्रस्थानी ठेऊन प्रदर्शन होत असल्याने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, शेती अवजारे व यंत्रे बियाणे, खत, किटकनाशके, इरिगेशन कंपन्यांसह शेतीशी संबंधित विविध मोठया कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात असेल. शेतक-यांसाठी फळपिके आणि इतर पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीमाल विपणण आणि परदेशी बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग आणि हवामानातील बदलांचा शेतीवरील परिणाम आदी खास चर्चासत्रे यावेळी आयोजित करण्यात आली आहेत असेही वसंत देशमुख यांनी सांगितले.

प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्टॉलधारक सहभाग घेत आहेत. बियाणे, लागवड तंत्रज्ञान, शेतमाल विपणन, शेती पूरक उद्योग यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये उपयोग कृषी उत्पादने साठवणूक, नाबार्डच्या माध्यमातून कृषी बँकिंग तसेच आपले उत्पादन दुप्पट करण्याकरिता शासनाने आखलेल्या विविध योजनांची माहिती, या विषयांशी निगडित स्टॉल प्रदर्शनात असतील.

पीक प्रात्यक्षिकांचे आकर्षण

या कृषी प्रदर्शनाचे एक अत्यंत आगळे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आयोजित करण्यात आलेली पीक प्रात्यक्षिके. विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान या पीक प्रात्यक्षिकातून दिली जाणार आहे.

देशातील काही मोजक्या प्रदर्शनाव्यतीरिक्त फक्त महाअ‌ॅग्रोमध्येच पीक प्रात्यक्षिक घेतले जाते असे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकरी ते ग्राहक थेट संबंध शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना त्यांचा माल विकता यावा, मध्यस्थांची साखळी कमी व्हावी यासाठी शेती बाजाराचा उपक्रम विशेषत्वाने प्रदर्शनात सुरुवातीपासूनच राबवला जातो.

यावर्षीही शेती बाजारमध्ये 50 ते 60 स्टॉल आहेत. विविध बचत गट, प्रगतिशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी कंपन्या 'आत्मा'च्या माध्यमातून सहभागी होत आहेत. त्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने, सेंद्रीय शेतीतून उत्पादित भाज्या, फळे, धान्य अशा शेकडो वस्तूंची थेट विक्री या ठिकाणी होईल.खवय्यांसाठी खाद्य यात्रागोदाकाठ खाद्य संस्कृतींतर्गत खवय्यांना विविध चवींचे पदार्थ खाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात मासवडी, थालीपीठ, गव्हाची खीर, कुल्फी, मटक्यातील गावरान आणि ब्रॉयलर चिकन, तांबडा आणि पिवळा रस्सा, खेकडा आणि मासे, कोंबडी वडे आणि चिकन बिर्याणी, व्हेज आणि नॉनव्हेज थाळी, भरीत, पिठल आणि भाकरी, खान्देशातील मांडे आणि वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी याशिवाय हुरडा, गावरान मेवा, चाट आदी स्टॉलही असणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.पत्रकार परिषदेला प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक वसंत देशमुख , सिमा चे शिवप्रसाद जाजू , कृषी तंत्र विद्यापीठाचे प्राचार्य के.टी . जाधव , मराठवाडा शेती सहाय्य्य मंडळाचे अजय गांधी , प्रगतिशील शेतकरी आणि मॅन्ग्रो चे संचालक सुशील बलदवा , प्रगतिशील शेतकरी रंगनाथ जाधव यांची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...