आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

74 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत साडेबारा लाख रुपये:मागणीसाठी आयटकच्या वतीने घाटीत निदर्शने; प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार उपायुक्त कार्यालयाने आदेश देऊनही घाटी रुग्णालयातील कामगारांसाठीची थकीत किमान वेतनाच्या फरकाची तब्बल साडेबारा लाखाची रक्कम अडवून ठेवण्यात आली आहे. 74 कर्मचाऱ्यांची ही थकीत रक्कम असून सातत्याने मागणी केल्यानंतरही दिली जात नाही. त्यामुळे आयटकच्या वतीने घाटीतील वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

घाटीच्या वतीने कंत्राटी कंपन्याच्या माध्यमातून कामगारांची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये कामगारांना कागदावर दिला जाणारा पगार आणि प्रत्यक्ष दिला जाणारा पगार यामध्ये तफावत आहे. कामगारांना प्रत्यक्ष तेरा हजार पगार असतांना तो आठ ते साडे आठ हजारच दिला गेला. त्यामुळे थकीत कामगाराची साडेबार लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

प्रशासनानेच निर्णय घ्यावा

याबाबत आयटकचे अभय टाकसाळ यांनी सांगितले की, लोकशाही पध्दतीने आंदोलन करून कथित कंत्राटी कामगारांच्या शोषणाबाबत प्रशासनास निवेदन देण्यात येतात. मात्र त्यातील अनेक प्रश्न चर्चेतून सोडविण्यासारखे असतानाही प्रशासन झुलवत ठेवतेय. त्यामुळे आज कामगारांनी लोकशाही पध्दतीने निदर्शने करित आंदोलन केले. 12 लाख रुपये दाबून ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबीत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ठेकेदारी नही चलेगी, कोविड योद्ध्यांना सेवेत कायम करा, घाटीत प्रत्येक रोगाच्या तंज्ञ डाॅक्टरची नेमणूक करा, घाटीची रसद रोखुन खाजगी रुग्नालयांना मदत करणारे सरकार मुर्दाबाद , गोळ्या औषध मोफत मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.

या करण्यात आल्या मागण्या

यावेळी आयटकच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कल्याणकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर एक सप्टेबर पर्यत निर्णय नाही झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कथित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा. तसेच ज्येष्ठता यादी जाहीर करा तसेच कामगार कायद्यान्वये देण्यात येणाऱ्या किमान वेतन व किमान वेतनाच्या फरकाची रक्कम त्वरित खात्यात जमा करावी बेकायदेशीर पणे कामावरून काढलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, राजू हिवराळे, अभिजीत बनसोडे, गौतम शिरसाठ, निलेश दिवेकर, दीपक मगर, नंदा हिवराळे, कविता जोगदंड, किशोर शोजुळ, दिनेश साळवे, अंजुम शेख यासह अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...