आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटीत निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातले निवासी डॉक्टर सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागेसाठी तसेच निवासी डॉक्टरांच्या स्टाईफंड आणि इतर मागण्यासाठी राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
घाटीत ओपीडी आणि आयपीडी मध्ये निवासी डॉक्टरांनी सेवा देणे बंद केले आहे. सध्या कुठल्याही इमर्जन्सी सेवा बंद केल्या नाहीत. मात्र मागण्या मान्य नाही झाल्यास या इमर्जन्सी सेवा बंद करणार असल्याचा इशारा मार्डचे अध्यक्ष डॉ. अमोल चींधे यांनी दिला आहे.
सोमवारी सकाळी डॉक्टरांनी मागण्यासाठी निदर्शने देखील केली. तर प्रशासनाच्या वतीने मार्ड च्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून त्यांच्या मागण्या सोडवण्यात येणार असल्याचं प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कल्याणकर यांनी दिली आहे.
राज्यात वैद्यकीय शिक्षण सेवेअंतर्गत सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही या जागा भरत नाही. त्यामुळे मार्डच्या वतीने या जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांनी केली निदर्शने मार्च वतीने राज्यभरात त्यांच्या मागण्यांसाठी संपर्क करण्यात येत आहे त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी ओपीडी मध्ये सेवा देणे बंद केले आहे.त्याचा काहीसा परिणाम रुग्ण संख्या कमी होण्यावर पाहायला मिळत आहे.
याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कल्याणकर म्हणाले की आम्ही मार्ड च्या डॉक्टरांसोबत बैठक देखील घेतली आहे तसेच सर्व वार्ड मध्ये राऊंड देखील घेतला आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या ड्युटी देखील लावण्यात आले आहेत त्यामुळे फारसा परिणाम झाले नसल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली आहे.
मुंबईतल्या मनपाच्या रुग्णालयाचा स्टाईफंड आणि मुंबई बाहेरील इतर वैद्यकीय महाविद्यालयातल्या स्टाईफंड यामध्ये फरक आहे. मुंबईतल्या मनपाच्या सिनीयर रेसीडेन्टला स्टायफंड एक लाख रुपयेइतका असून राज्यात हा इतर महाविद्यालयातल्या डॉक्टरांना 75 हजार इतका आहे. तर मुंबईत कनिष्ट निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना 75 हजार तर इतर ठिकाणी 64 हजार आहे. ही तफावत दुर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच हॉस्टेलमधल्या मुलांना स्वच्छता पिण्याचे पाणी यापासून इतर सुविधाची अडचण आहे. त्यामुळे या सुविधा देण्याची मागणी मार्डचा अध्यक्ष अमोल चिंधे यांनी केली आहे.
- अमोल चींधे, अध्यक्ष मार्ड् विजय कल्याणकर वैद्यकीय अधीक्षक घाटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.