आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतले 354 सरकारी निवासस्थाने धोकादायक:इमारत पाडण्याच्या अभ्यागात समितीमध्ये चर्चा; दुर्घटना घडल्यास घाटी राहणार जबाबदार

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतल्या वर्ग - 4 कर्मचाऱ्यांच्या सरकारी निवास स्थानामध्ये अनधिकृत लोक राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये सातत्यानेही इमारत पाडण्याच्या मागण्या करण्यात येत होत्या. शनिवारी अभ्यागत समितीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. या धोकादायक इमारती नाही पडल्या आणि एखादी घटना घडली तर त्यामध्ये घाटीचेच नाव बदनाम होईल. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात यावी असा सूचना अभ्यास समितीचे अध्यक्ष प्रदीप जयस्वाल यांनी दिले आहेत.

घाटीच्या अभ्यागत समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीमध्ये आमदार प्रदीप जयस्वाल तसेच अभ्यासात समितीचे सदस्य भाऊसाहेब जगताप, इक्बाल सिंग गिल, प्रमोद ठेगड नारायण कानकाटे सदस्य उपस्थित होते.

तर महाविद्यालयाची बदनामी होईल

बैठकीत मोहसीन अहमद यांनी हा मुद्दा उपस्थित केला गेल्या तीन वर्षापासून सर्व बांधकाम विभागाने या इमारती धोकादायक असल्याचा आवाज दिलेला आहे. मात्र तरीही त्या पाडण्याबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे एखादी घटना घडून या मधल्या राहणाऱ्या रहिवाशांच्या अंगावर इमारत पडल्यास अनेकांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव बदनाम होईल या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. अभ्यास समितीचे अध्यक्ष प्रदीप जयस्वाल यांनी यावेळी प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच आपल्याला काही मदत लागल्यास आपण ती सर्व मदत देण्यास तयार असल्यास देखील जयस्वाल यांनी सांगितले.

टप्प्याटप्प्याने करणार कारवाई याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड म्हणाले की, या प्रकरणात जवळपास 25% निवासस्थानामध्ये आमचे कर्मचारी राहतात आम्ही त्यांना पर्यायी जागा देत असून हे लोक रिकामी झाल्यानंतर उर्वरितलोकांना बाहेर काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...