आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढते लोण:औरंगाबादेत आणखी 3 पाॅझिटिव्ह, 3 दिवसांत 11 रुग्ण वाढले; शहरातील रुग्णांचा आकडा 14

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नांदेडमध्ये इंडोनेशियातील १० जणांवर गुन्हा

शहरात काेराेनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत अाहे. मंगळवारी एकाच दिवशी तीन रुग्ण वाढले. हे तिन्ही रुग्ण अाधीच बाधा झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांपैकीच अाहेत. अाैरंगाबादेत अाता रुग्णांची संख्या १४ वर गेली अाहे. विशेष म्हणजे गेल्या तीनच दिवसांत ११ रुग्ण वाढले अाहेत. शहरात काेराेनामुळे एकाचा मृत्यू झाला असून, त्याच्या कुटुंबातील दाेघांनाही लागण झाली अाहे. या मृताच्या पैठणमधील नातेवाइकांचीही तपासणी झाली. 

नांदेडमध्ये इंडोनेशियातील १० जणांवर गुन्हा

नांदेड शहरात वास्तव्याला असलेल्या इंडोनेशियातील १० जणांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्वजण मरकज मेळाव्याला उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

इंडोनेशियातील ५ पुरुष व ५ महिला व दिल्ली येथील एक जोडपे १५ मार्चपासून शहरात वास्तव्याला आहे. २ ते ८ मार्च दरम्यान मरकज मेळाव्याला ते सर्व उपस्थित होते. ९ मार्चपर्यंत दिल्लीत एका मशिदीत त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर त्यांनी पुढचे दोन-तीन दिवस दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले. १५ मार्चला सकाळी दिल्लीहून ते शहरात दाखल झाले. हिलालनगर, रहेमतनगर व इतर लोकांच्या घरी ते राहिले.  संचारबंदीतही त्यांनी वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलली. मरकज मेळाव्याला हजर असल्याची बाबही त्यांनी लपवली. 

बातम्या आणखी आहेत...