आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरीज सुरूच:औरंगाबादेत 2 पॉझिटिव्ह, आकडा 20; जालना जिल्ह्यात 267 नमुने निगेटिव्ह

औरंगाबाद/ लातूर/ हिंगोली/ नांदेड3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद वगळता मराठवाड्यात एकही पॉझिटिव्ह नाही

औरंगाबादेत अाणखी दाेन जणांना काेराेनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. शहरातील रुग्णसंख्या २० वर गेली अाहे. सिडकाे एन- ११ मधील २९ वर्षीय तरुण व देवळाई परिसरातील ४० वर्षीय महिलेचा या रुग्णांत समावेश अाहे. यापूर्वी सिडकाे एन-४ मधील बाधित महिलेच्या कुटुंबीयांशी संबंधित हा युवक असल्याचे सांगितले जाते. देवळाई परिसरात यापूर्वी दाेन वाहनचालक बाधित ठरले अाहेत, मात्र शुक्रवारी पाॅझिटिव्ह ठरलेल्या महिलेचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नसल्याची प्राथमिक माहिती अाहे. 

औरंगाबाद वगळता मराठवाड्यात एकही पॉझिटिव्ह नाही 

नांदेड जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आतापर्यंत एकूण ४८२ जणांना क्वॉरंटाइन करण्यात केेले आहे. लातूर जिल्ह्यात मरकजला गेलेले ८ जण पॉझिटिव्ह आढळलेले होते. हिंगोलीत आयसोलेशन वॉर्डमध्ये ३७ जण भरती असून १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर ४९५६ जणांना क्वॉरंटाइन केले आहे. बीड जिल्ह्यात ११६ परदेशातून आले असून यापैकी सध्या केवळ १ जण होम क्वॉरंटाइन आहे. इतरांचा होम क्वॉरंटाइन कालावधी संपला आहे.

जालना जिल्ह्यात एकूण संशयितांची संख्या ४९९ असून १३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण ३०६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी २६७ नमुने निगेटिव्ह, तर १ नमुना पॉझिटिव्ह आला आहे. ३४ जणांचे अहवाल येणे असून ३ नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत. 

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूसंदर्भात २८७ संशयितांची नोंद झाली. २४२ पैकी २०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २० स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. 

बातम्या आणखी आहेत...