आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य आणि स्वच्छता जपण्यासाठी खास गृहिणी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना उपयोगी ठरले असे मल्टिपर्पज ऑटोमॅटिक ब्रश शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रणोती येळीकर या विद्यार्थीनीने तयार केला आहे.
या ब्रशचा उपयोग एकाचवेळी पाणी, साबण, स्वच्छ होणे ही कामे एकाचवेळी होतात. यात टाकून दिलेला पीव्हीसी पाईप, डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. शहरातील शिशु विकास मंदिर शाळेत 50 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 70 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उदघाटन प्रसंगी विस्तार अधिकारी जे.व्ही.चावरे, बाळासाहेब चोपडे, शिरसाठ यांची उपस्थिती होती.
यामुळे एकाचवेळी पाणी, साबण, स्वच्छ होणे ही कामे एकाचवेळी होतात. यात टाकून दिलेला पीव्हीसी पाईप, डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. शहरातील शिशु विकास मंदिर शाळेत 50 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 70 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उदघाटन प्रसंगी विस्तार अधिकारी जे.व्ही.चावरे, बाळासाहेब चोपडे, शिरसाठ यांची उपस्थिती होती. "तंत्रज्ञान आणि खेळणी ' या संकल्पनेवर आधारित प्रयोेग विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. ज्यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण अनुकूल सामग्र, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरण चिंता, वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास, आमच्यासाठी गणित आदी.
विषयावरील प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. यात आकर्षणाचे केंद्र ठरली ती डॉ.आर.पी.नाथ हायस्कुलच्या अरविंद भारती, उजेफ मुजीब सय्यद, रिजवान राजू पठाण यांनी शिक्षिका स्मिता देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्बाइड तोफ तयार केली. टाकाऊ असलेल्या पीव्हीसी पाईप, त्याचे पाच सेमीचे तीन तुकडे करुन त्यांना जोडले. त्याला सायकलचे जुने दोन चाक जोडले, कागदी कप,आगपेटी, पाणी याचा वापर यात केला आहे. तर अलमीर उर्दू प्रायमरी स्कुलच्या सातवीत शिकणाऱ्या मिर्झा अनस याने मॅथ्स मॅजिकल टॉइज हा प्रयोग सादर केला. खेळाच्या साहित्यातून आपण गणिताची भिती कशी दूर करु शकतो गणित सोप्या पद्धतीने शिकू शकतो. हे दाखविण्याचा प्रयत्न केला. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर सादरीकरण करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.