आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:परपुरुषासोबत वैवाहिक जीवनासारखे राहणाऱ्या पत्नीला मंजूर केलेली अंतरिम पोटगी रक्कम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यक्तीची पत्नी परपुरुषासोबत वैवाहिक संबंध असल्यासारखे राहत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी संबंधित महिलेस मूळ पतीकडून महिना ५ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा काेपरगाव न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द केला. यासंबंधी महिलेचा पती, तिचे नातेवाईक यांनी सादर केलेले पुरावे तपासून फेरनिर्णय घ्यावा, असे आदेशही खंडपीठाने काेपरगाव न्यायालयाला दिले आहेत. परपुरुषासोबत पत्नी राहत असल्याचे पुरावे पतीसह पत्नीच्या जवळच्या नातेवाईकांनी न्यायालयात सादर केले होते.

या प्रकरणातील पती, पत्नी हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांचा विवाह २००२ मध्ये झाला. त्यांना दाेन अपत्येही आहेत. मात्र, २०१४ पासून दाेघेही विभक्त राहतात. मुले पतीकडे राहतात. पती समाजातील प्रतिष्ठित क्षेत्रात कार्यरत असून पत्नी एका पुरुषासाेबत वैवाहिक असल्यासारखे जीवन जगत आहे. असे असतानाही पत्नीने काेपरगाव न्यायालयात अर्ज दाखल करून मूळ पतीकडून पाेटगी मिळावी, अशी मागणी केली हाेती.

त्यावर काेपरगाव न्यायालयाने पत्नीला ५ हजार रुपये महिना पाेटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. या आदेशाला पतीने खंडपीठात अॅड. नितीन चाैधरी यांच्यामार्फत कलम १२५ (४) नुसार आव्हान दिले. १२५ (४) नुसार कुठलीही पत्नी इतर पुरुषासाेबत वैवाहिक जीवन जगत असेल तर तिला पहिल्या पतीकडून किंवा मूळ पतीकडून पाेटगी मागण्याचा अधिकार नाही व त्याप्रमाणे पुरावेही सादर करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद अॅड. चाैधरी यांच्याकडून करण्यात आला. सुनावणीनंतर खंडपीठाने अंतरिम मंजूर झालेला पाेटगीचा निर्णय रद्द केला. तसेच पुन्हा पुरावे तपासून निर्णय घ्यावा, असे आदेश केले.

महिलेच्या आई-वडिलांनीही न्यायालयात याबाबत केली होती तक्रार सुनावणीवेळी पतीकडून पत्नीचे परपुरुषासाेबतचे वैवाहिकसारखे जीवन जगत असल्याच्या संदर्भाने पुरावे देण्यात आले. पत्नीकडील नजीकच्या नातेवाइकांच्याही तक्रारी मांडण्यात आल्या. संबंधित महिलेच्या आई-वडिलांनीही कनिष्ठ न्यायालयात यासंबंधी तक्रार केली होती. पतीला पगार चांगला आहे. असे पती असताना संबंधित महिला परपुरुषासोबत राहते, असेही त्या तक्रारीत मांडण्यात आले होते.